गॅस सिलिंडर स्टॅम्पिंगनंतर आता वाढीव गॅस जोडण्या समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रॉकेलचे नियतन घटले आहे. जिल्ह्यातील पाच टँकर रॉकेल कमी झाले असून त्यामुळे रॉकेलच्या दुहेरी लाभामुळे होणारा काळा बाजार थांबण्यास मदत होणार आहे. ...
वसमत येथे आयोजित हल्लाबोल यात्रेनिमित्त झालेल्या सभेत चोरट्यांनी अनेकांच्या पाकीट, मोबाईलवर डल्ला मारला. हल्लाबोल सभा अनेकांना चांगलीच महागात पडली. १ लाख, १३ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. ...
येत्या चोवीस तासांत मराठवाड्याला थंडीच्या लाटेचा फटका सोसावा लागण्याची भीती हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनानेही नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेवूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. ...
फेब्रुवारी महिन्यात पार पडणा-या महाशिवरात्र महोत्सावानिमित्त श्री नागनाथ संस्थान व नागरिकांची रविवारी बैठक घेतली. यात यात्रेच्या अनुषंगाने विविध समित्यांची स्थापना केली. ...
आरटीई’ अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी इंग्रजी शाळांना आॅनलाईन नोंदणी बंधनकार आहे. संबधित तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकाºयांना त्यांच्या तालुक्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांची नोंदणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. २२ जानेवारीपासून आॅनलाईन ...
जमिनीच्या जुन्या वादातून तहसीलच्या प्रांगणात चौकशीसाठी आलेल्या दोन गटांत फिल्मीस्टाईलने मारहाण झाल्याची घटना २२ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता घडली. यात चार गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनीच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. ...
सध्याचे भाजप सरकार फेकू सरकार आहे, अच्छे दिनच्या नावाखाली सरकारने केवळ शेतकरी व जनतेची लूट केली आहे. जेवढ्या योजना जाहीर केल्या, तेवढ्या फेल गेल्या. त्यामुळे हे सरकारही फेल गेल्याचा आरोप अजित पवार यांनी हिंगोली येथील गांधी चौकात २२ जानेवारी रोजी केला ...
नारायण राणेंना मुख्यमंत्री नुसती आश्वासने देत आहे. दिवाळी जावू दे…दिवाळी गेली आता नवीन वर्षही लागले…संक्रात होवू दे..आत्ता तर त्यांचीच संक्रात झाली. ...
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील शेजारच्या कर्नाटकात जावून त्या राज्याचा उदो-उदो करीत आहेत. बेळगावचा सीमाप्रश्न माहिती असताना त्यांचे हे कृत्य म्हणजे त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेची काही देणे-घेणे नाही असेच आहे. यामुळे एकतर त्यांनी राजीनामा द्यावा अन्यथ ...