तीक्ष्ण हत्याराने एकाचा खून, पिंपरखेड येथे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 15:45 IST2023-02-15T15:43:51+5:302023-02-15T15:45:26+5:30

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरखेड येथील सुरेश श्यामराव गुंजकर (वय ४०) हा १४ फेब्रुवारी रोजी रात्रीपासून घरी आला नव्हता.

One killed by a sharp weapon, stir in Pimperkhed | तीक्ष्ण हत्याराने एकाचा खून, पिंपरखेड येथे खळबळ

तीक्ष्ण हत्याराने एकाचा खून, पिंपरखेड येथे खळबळ

संदीप घुगे -

बासंबा :हिंगोली तालुक्यातील पिंपरखेड येथे तीक्ष्ण हत्याराने वार करून एका ४० वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे पिंपरखेड परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरखेड येथील सुरेश श्यामराव गुंजकर (वय ४०) हा १४ फेब्रुवारी रोजी रात्रीपासून घरी आला नव्हता. तर दुसऱ्या दिवशी १५ फेब्रुवारीच्या सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह गावालगत असलेल्या ओढ्यात आढळून आला. घटनेची माहिती बासंबा ठाण्यात मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहाच्या डोक्याला गंभीर मार असून, तीक्ष्ण हत्याराने वार केले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, बासंबा ठाण्याचे पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांनी भेट दिली. दरम्यान, हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी दुपारपर्यंत बासंबा ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.
 

 

Web Title: One killed by a sharp weapon, stir in Pimperkhed