शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

आता मजुरी अदायगीलाही विलंबच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:21 AM

वारंवार बदलणारे अधिकारी व कर्मचारी मग्रारोहयोतील मजुरांच्या मुळावर उतरत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मजुरी मिळण्यास विलंब होत असल्याची बोंब वाढली आहे. आधीच कुशलच्या कामाचा निधी नसल्याने मग्रारोहयोतील कामांवर परिणाम होत असताना ही नवी समस्याही मजुरांची डोकेदुखी ठरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वारंवार बदलणारे अधिकारी व कर्मचारी मग्रारोहयोतील मजुरांच्या मुळावर उतरत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मजुरी मिळण्यास विलंब होत असल्याची बोंब वाढली आहे. आधीच कुशलच्या कामाचा निधी नसल्याने मग्रारोहयोतील कामांवर परिणाम होत असताना ही नवी समस्याही मजुरांची डोकेदुखी ठरत आहे.हिंगोली जिल्ह्यात साप्ताहिक मजूर उपस्थिती आता ३२ हजारांवर गेलेली आहे. काही तालुक्यांत मजूर या कामाकडे मोठ्या प्रमाणात वळल्याचे दिसत आहे. कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजूर तर यापूर्वी काम न मिळाल्याने मजुरी भत्ता मिळावा व नव्याने काम मिळावे, यासाठी जिल्हा कचेरीसमोर पंधरा दिवसांपासून धरणे आंदोलन करीत आहेत. सहकुटुंब सुरू असलेल्या आंदोलनामुळे आंदोलनकर्त्यांना बाहेरच्यांची सहानुभूती मिळत असली तरीही प्रशासनासमोर मात्र कठीण प्रसंग आहे. सोळा दिवस झाले मात्र हा प्रश्न खरेच सुटेल की नाही, हे कळायला मार्ग नाही.दुसरीकडे मजुरी मिळत नसल्याची बोंब कळमनुरी व सेनगाव तालुक्यात वाढली आहे. कळमनुरीत तर कधी बीडीओ, कधी सहायक बीडीओ, कधी लेखा विभागाचा कर्मचारी बदलला जातो. त्यामुळे त्यांच्या पाठशिवणीच्या खेळात मजूर हैराण आहेत. एकीकडे हे प्रकार सुरू असताना दुसरीकडे मजूर उपस्थिती व मग्रारोहयोतील खर्च यंदा वाढल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. या योजनेत अकुशल कामांवर जवळपास १४.६0 कोटी रुपये खर्च झाला. तर कुशल कामावर ५.२१ कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे. यामध्ये जवळपास १.३२ कोटी रुपये अजून अदा होणे बाकी असल्याचे सांगितले जात आहे. एकंदर यंदा जिल्ह्यातील काही भागात तरी मग्रारोहयोची कामे जोरात असून काही भाग अजूनही कामांच्या प्रतीक्षेतच असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात एकूण २२८ मस्टर १५ दिवसांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असून यात सर्वाधिक कळमनुरीत ११0 आहेत. यापैकी १0 जानेवारीचे, ९५ फेब्रुवारीचे आहेत. उर्वरित मार्चचे आहेत. तर आतापर्यंत औंढा-२३, हिंगोली-४0, सेनगाव-५५ अशी तालुकानिहाय संख्या आहे. कळमनुरी व सेनगावला कायम होणाऱ्या बदलामुळे डीएसीअभावी हे प्रकार वाढले आहेत.

टॅग्स :collectorतहसीलदारRural Developmentग्रामीण विकासHingoliहिंगोलीzpजिल्हा परिषद