हिंगोलीत आज एकोणिसाव्या धम्म परिषदेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:27 IST2021-02-12T04:27:51+5:302021-02-12T04:27:51+5:30

धम्म परिषदेचे उद्घाटन भदंत धम्मसेवक यांच्या हस्ते तर अध्यक्ष म्हणून भदंत डॉ. उपगुप्त महास्थवीर (पूर्णा) हे राहणार आहेत. ...

Nineteenth Dhamma Conference organized in Hingoli today | हिंगोलीत आज एकोणिसाव्या धम्म परिषदेचे आयोजन

हिंगोलीत आज एकोणिसाव्या धम्म परिषदेचे आयोजन

धम्म परिषदेचे उद्घाटन भदंत धम्मसेवक यांच्या हस्ते तर अध्यक्ष म्हणून भदंत डॉ. उपगुप्त महास्थवीर (पूर्णा) हे राहणार आहेत.

हिंगोली शहराजवळ असलेल्या शांतीनगर अंधारवाडी भागात, कालकथित भंते काश्यप महाथेरो यांच्या प्रयत्नाने मागील १८ वर्षांपासून सतत बौध्द धम्म परिषदा होत आहेत. याच अनुषंगाने १२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता शांतीनगर जेतवन बुध्दविहार येथे पंचरंगीत धम्म ध्वजाचे ध्वजारोहण भिक्खू संघाच्या उपस्थितीत होणार आहे. अध्यक्षस्थानी भदंत डॉ. उपगुप्त महास्थवीर हे राहणार आहेत. तर धम्म परिषदेचे उद्घाटन भदंत धम्मसेवक महाथेरो (मुळावा) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रा. खेमधम्मो महाथेरो (मुळावा), भदंत शरणानंद महाथेरो (पाथरी), भदंत प्रा. डॉ. सत्यपाल महाथेरो , भदंत यश काश्यपायन महाथेरो (जयसिंगपूर), भदंत इदवंस महाथेरो (मुदखेड), भदंत करुनानंद थेरो, भदंत भिक्खू विनयबोधी, प्रिय थेरो (नांदेड) यांच्यासह अनेक भिक्खूसंघाची उपस्थिती राहणार असून धम्मदेशना देणार आहेत. इतरही अनेक राजकीय व प्रशासकीय क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Nineteenth Dhamma Conference organized in Hingoli today