मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी राष्ट्रीय विराट लोकमंचचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST2021-07-07T04:36:29+5:302021-07-07T04:36:29+5:30

विराट लोकमंचच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा समिती आणि महेमुदूर रहेमान समितीच्या अहवालाप्रमाणे मुस्लिम ...

National Virat Lok Manch agitation for reservation of Muslim community | मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी राष्ट्रीय विराट लोकमंचचे आंदोलन

मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी राष्ट्रीय विराट लोकमंचचे आंदोलन

विराट लोकमंचच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा समिती आणि महेमुदूर रहेमान समितीच्या अहवालाप्रमाणे मुस्लिम समाजाला शैक्षणिक आणि रोजगारामध्ये तत्काळ १० टक्के आरक्षण देण्यात यावे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण संशोधन संस्था जसे की बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर प्रशिक्षण संस्था संशोधन केंद्र सुरू करण्यात यावे. मुस्लिम समाजावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी ॲट्रोसिटीसारखा अल्पसंख्याक अन्याय अत्याचार प्रतिबंधक संरक्षण कायदा तयार करून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी, दिवसेंदिवस मोहसीन शेखसारख्या निष्पाप मुस्लिमांची मॉबलिंचिंग केली जात आहे. मॉबलिंचिंगच्या घटना रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मॉबलिंचिंगविरोधात कायदा तयार करण्यात यावा, जिल्हा पातळीवर मुस्लिम विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा मिळण्यासाठी वसतिगृहाची उभारणी करण्यात यावी.

विविध आयोगांनी आपल्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे केवळ मुस्लिम समाजाला सर्व भौतिक सुविधा प्राप्त होण्यासाठी राष्ट्रीय आपदाच्या नियमाप्रमाणे विशेष निधी निर्माण करून त्याद्वारे मुस्लिम समाजाचे मागासलेपण दूर करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवेदनावर संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल, तौफिक अ. खान शेख नौमान नवीद, रवी जैस्वाल, सय्यद शोएब,नफीस पहिलवान, शेख बासित महेबूब, शेख शाहनवाज हुसैन,सय्यद शौकत,सतीश लोणकर, शेख आवेज पठाण, साजिद खान, शेख अफरोज फिरोज, मो. तुफेल बागबान, नितीन तपासे, सय्यद असगर हाश्मी,विनोद गायकवाड, शेख हमीद कमाल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: National Virat Lok Manch agitation for reservation of Muslim community