शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

आता तर समर्थकाच्याच कानाखाली, आमदार संतोष बांगर यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 14:30 IST

शिंदे गटात गेल्यापासून आणि नेहमी वादाच्या भोवऱ्यात असल्याने चर्चेत असणारे आमदार बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

कळमनुरी (हिंगोली):  राज्यात सत्तांतर झाल्यापासून अनेकदा ठाकरे गट आणि शिंदे गटाचे नेते आमने सामने आले आहेत. यातच नेहमीच चर्चेत असणारे हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गटात वाद झाला. हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई येथे मसाई मातेची यात्रा सुरू आहे. यात्रेत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना बोलवायचं नाही अशी परंपरा आहे. मात्र असं असतानाही आमदार बांगर या यात्रेत गेल्याने गावकऱ्यांनी गावाबाहेरच त्यांचा ताफा अडवला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला. यावेळी संतोष बांगर यांनी आपल्याच कार्यकर्त्याच्या कानाखाली लगावली. 

शिंदे गटात गेल्यापासून आणि नेहमी वादाच्या भोवऱ्यात असल्याने चर्चेत असणारे आमदार बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई येथे दरवर्षी मसाई मातेची यात्रा भरते. या यात्रेत भाविकांची  मोठ्याप्रमाणावर गर्दी असते. या यात्रेत कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्यांना बोलावलं जात नाही. अनेक वर्षांची ही परंपरा पाहता जिल्ह्यातील राजकीय पुढारी देखील या यात्रेला जाण्यासाठी टाळतात. पण, आज शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह यात्रेत हजेरी लावली. पण, यावेळी गावकऱ्यांनी त्यांना गावात प्रवेश दिला नाही. त्यावेळी, त्यांचे समर्थक आणि गावकरी एकमेकांसोबत शाब्दीकरित्या भिडले. यावेळी, समर्थकाडून ग्रामस्थांना विरोध करण्यात आल्यानंतर, आमदार बांगर यांनी समर्थकाच्या कानशिलात लगावली. आमदार बांगरा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यामुळे, पुन्हा एकदा त्यांच्या मारहाणीची चर्चा होत आहे. 

वारंगा मसाई यात्रेची मोठी परंपरा

शेकडो वर्षांपासून ही यात्रा या गावांमध्ये भरते. यात्रेनिमित्त या गावासह पंचक्रोशीतील हजारो भाविक येथे सहभागी होत असतात. यंदा ही यात्रा 7 जानेवारी रोजी भरली आहे. ग्रामस्थांनी आमदार बांगर यांना मंदिराच्या अलीकडेच रोखले आणि आज देवीच्या दर्शनासाठी येऊ नका, यात्रा झाल्यानंतर या असे सांगितले. यावेळी गावच्या यात्रेत राजकारण नको म्हणत शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मात्र पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला आणि आमदार बांगर यांना दर्शनासाठी आतमध्ये सोडण्यात आलं.

टॅग्स :MLAआमदारHingoliहिंगोलीShiv SenaशिवसेनाFairजत्रा