वर्दीतला माणूस करतो ‘त्या’ गुरांचा सांभाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:56 IST2019-01-10T00:56:09+5:302019-01-10T00:56:29+5:30
निर्दयीपणे ट्रकमध्ये कोंबून मध्यप्रदेशकडून हैदराबादकडे कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी ३ जानेवारी रोजी पकडला होता. आठ दिवसांपासून या गुरांचा सांभाळ पोलीस करत आहेत.

वर्दीतला माणूस करतो ‘त्या’ गुरांचा सांभाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : निर्दयीपणे ट्रकमध्ये कोंबून मध्यप्रदेशकडून हैदराबादकडे कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी ३ जानेवारी रोजी पकडला होता. आठ दिवसांपासून या गुरांचा सांभाळ पोलीस करत आहेत.
हिंगोलीत नांदेड नाका येथून गुरे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी ३ जानेवारी रोजीच्या रात्री १ वाजेच्या सुमारास पकडला होता. वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी सेनगाव येथून येत असताना त्यांना गुरे घेऊन जाणारा उभा ट्रक आढळला. पोलिसांनी चौकशी केली असता, ट्रकमध्ये निर्दयीपणे गुरे कोंबल्याचे निदर्शनास आले. हा ट्रक पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात आणत गुरांना खाली उतरवले होते. ट्रकमध्ये एकावर एक कोंबल्यामुळे अनेक गुरे जखमी झाले होते. काही जनावरांचा मृत्यूही झाला होता. दोन जनावरांना जागेवरुन हलताही येत नाही. ते वाहनातून काढल्यानंतर तेथेच पडून आहेत. आता पोलिसांच्या ताब्यातील ४६ जनावरांची देखभालीसाठी मदत करण्याचे आवाहन पोलिसांनीकेले आहे. निवारा तसेच चारा पाण्याची व्यवस्था शहर पोलीस ठाण्याने आतापर्यंत केली आहे. चाऱ्यासाठी प्राणीप्रेमी, सेवाभावी संस्था किंवा स्वयंसेवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन फौजदार पी. के. कांबळे यांनी केले आहे.