शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

Lok Sabha Election 2019 : हिंगोलीत वंचित आघाडी पूर्ववैभवाकडे जाणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 15:32 IST

एकेकाळी हिंगोली लोकसभा मतदारसंघात भारिपचे माधवराव नाईक यांच्याशीच प्रमुख उमेदवाराची टक्कर असायची. मात्र त्यांनाही कधी जिंकता आले नाही.  मात्र ते वैभव लयाला गेले अन् उभारी घेण्याइतपत दुसरे सक्षम नेतृत्वही मिळाले नाही. आता वंचित आघाडीचा प्रयोग काय साध्य करील? याकडे लक्ष लागले आहे.

- विजय पाटील 

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघात निश्चित आकडेवारी सांगणे अवघड असले तरीही दलित, मुस्लिम, ओबीसी मतदारसंख्या ३५ टक्क्यांपेक्षा निश्चितपणे जास्त आहे. मात्र ही गठ्ठा मते कुणा एकाच्या पारड्यात जातील, असे म्हणने धाडसाचे ठरणार आहे.

या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर येथे १९९६ मध्ये माधवराव नाईक यांनी भारिपकडून १ लाख २४ हजार एवढी प्रभावी मते घेवून दुसरे स्थान मिळविले होते. १९९८ ला विश्राम घेवून त्यांनीच पुन्हा १९९९ ला दोन लाख ८ हजारांचा पल्ला गाठत पराभव पत्करला. २00४ ला भारिपकडून संजय राठोड होते. त्यांना २५ हजार मतांवरच समाधान मानावे लागले. त्यानंतर भारिपला उतरती कळा लागली अन् बसपा पुढे आली. २00९ मध्ये नाईक यांना ५२ हजार तर बसपाचे बी.डी. चव्हाण यांना १ लाख ११ हजार मते होती. २0१४ मध्येही बसपाचे चुन्नीलाल जाधवांना २५ हजार तर भारिपच्या रामराव राठोड यांना ९५७७ मते होती. यावरून भारिपची सातत्याने पिछेहाट होत गेल्याचे दिसते. तर ही मते कधी बसपाकडे झुकली तर कधी काँग्रेसच्या पारड्यात गेली. 

प्रभावी यंत्रणा उभारणे गरजेचे मोहन राठोड हे किनवटचे आहेत. किनवट वगळता इतरत्र प्रभावी यंत्रणा उभारणे हेच त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. जर यात त्यांना यश मिळाले तर ही बाब काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे.   च्यावेळी पुन्हा वंचित आघाडीच्या रुपाने मुस्लिम, दलित, ओबीसी मतांवर डोळा असला तरीही माधवराव नाईकांएवढा प्रभावी चेहरा यावेळी मैदानात नाही.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकhingoli-pcहिंगोलीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी