जिल्ह्यातील २०४ मंडळ अधिकारी-तलाठ्यांचे लॅपटॉप निविदेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:28 IST2021-04-06T04:28:52+5:302021-04-06T04:28:52+5:30

अनेकांना हाताळताच येत नाही अनेक तलाठ्यांना अजूनही लॅपटॉप व प्रिंटर हाताळता येत नाही. अशांनी आपल्या खासगी सहायकांमार्फत ही कामे ...

Laptops of 204 Board Officers-Talathas in the district are in tender | जिल्ह्यातील २०४ मंडळ अधिकारी-तलाठ्यांचे लॅपटॉप निविदेतच

जिल्ह्यातील २०४ मंडळ अधिकारी-तलाठ्यांचे लॅपटॉप निविदेतच

अनेकांना हाताळताच येत नाही

अनेक तलाठ्यांना अजूनही लॅपटॉप व प्रिंटर हाताळता येत नाही. अशांनी आपल्या खासगी सहायकांमार्फत ही कामे करून घेत वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे आता नव्याने दिलेल्या लॅपटॉप व प्रिंटरची हाताळणी योग्य पद्धतीने करावी लागणार आहे. त्यातच काही तलाठी, तर शासनाकडून सातबारावर मिळणाऱ्या रकमेतूनच लॅपटॉप खरेदी केल्याचे सांगत असून, अशा टेक्नोसॅव्ही तलाठ्यांकडे शहरी भागात कार्यालयही दिसून येते.

शासनाने मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप दिल्यास कामाची गती वाढण्यास मदत होणार आहे. आता एकतर खासगी लॅपटॉप ठेवावे लागते. अथवा कुठेतरी खासगी ठिकाणी जाऊन काम करावे लागते. ही समस्या टळेल. प्रशासनाकडून ही प्रक्रिया केली जात असल्याने आभार.

रामधन दराडे, मंडळ अधिकारी

मागील १९ वर्षांपासून स्वखर्चाने घेतलेल्या साहित्यावर तलाठी शासनाच्या ऑनलाइन योजनांचा कारभार करीत आहे. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लॅपटॉप व प्रिंटरसाठी निधीचे नियोजन केले आहे. ते लवकर मिळावेत, ही अपेक्षा आहे.

गजानन रणखांब, तलाठी

Web Title: Laptops of 204 Board Officers-Talathas in the district are in tender