शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीदरम्यान कडेकोट बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:43 IST

विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून २१ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून २१ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून थेट कारवाई केली जाणार असून हिंगोली जिल्ह्यात पोलीस प्रशासनाचे १२ तर महसूलचे चार असे एकूण १६ पॉर्इंटवर कडेकोट बंदोबस्त असणार आहे.निवडणुकीच्या कालावधीत पोलीस प्रशासनाकडून विविध कारवाया केल्या जातात. निवडणुक ते निकाल जाहिर होईपर्यंत पोलीस प्रशासनाला सज्ज राहावे लागते. त्या अनुषंगानेच आता विधानसभा २०१९ निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून पोलीस प्रशासनाची जिल्ह्यावर करडी नजर असणार आहे. पोलीस बंदोबस्त, रूटींगच्या कारवाया व पेट्रोलिंगचे नियोजन केले आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र जिल्हाभरात कडेकोट बंदोबस्त संदर्भात संबधित ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना कडक सूचनाही देण्यात आल्या आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलीस प्रशासनाला दक्ष राहावे लागणार आहे. दरम्यान आचारसंहितेचा भंग, आपसातील भांडण व हाणामाºया, दारूची चोरटी वाहतूक करणाºयांविरूद्ध कडक कारवाई केली जाणार आहे. ठिक - ठिकाणी पार्इंटवर पेट्रोलिंग केली जाणार असून यावेळी वाहनांची कसूचन तपासणी केली जाणार आहे. या पथकात पोलीस अधिकारी व महसूलचे अधिकाºयांचा समावेश असणार आहे.जिल्ह्यात १२ ठिकाणी पॉर्इंटबाहेरील जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्याच्या हद्दीत येणाºया वाहनांची तपासणी केली जाईल. यासाठी हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर विविध ठिकाणी १२ पॉर्इंटवर पोलीस व महसूलचे अधिकारी हजर असतील. पथकाद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे. यामध्ये गोरेगाव ठाणे हद्दीतील करेगावनाका येथील पॉर्इंटवर पथक तैनात असेल. तसेच सेनगाव-वाढोणा फाटा येलदरी टी पॉर्इंट, औंढा जिंतूर रोड रामेश्वर पाटी, हयातनगर टी पॉर्इंट, वसमत ते बाभूळगाव पूर्णा रोड, वसमत ते आसेगाव नांदेड जाणारा मधला रस्ता, वसमत ते नांदेड जिंतुर टी पार्इंट, आखाडा बाळापूर ते नांदेड हिवरा पाटी टी पॉर्इंट तसेच कळमनुरी ते वसमत गऊळबाजार पॉर्इंट इ. ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे.पेट्रोलिंगदरम्यान दोषी आढळणाºयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तर इतर चार ठिकाणी महसूलचे स्वतंत्र पथक तैनात असेल.

टॅग्स :Electionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा