‘आरोग्य’वरील ताण वाढला; डॉक्टरांचीच ५७ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST2021-03-31T04:30:12+5:302021-03-31T04:30:12+5:30

एकंदर जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या पाहता आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची संख्या भरणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालयाने अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे ...

Increased stress on ‘health’; 57 posts of doctors are vacant | ‘आरोग्य’वरील ताण वाढला; डॉक्टरांचीच ५७ पदे रिक्त

‘आरोग्य’वरील ताण वाढला; डॉक्टरांचीच ५७ पदे रिक्त

एकंदर जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या पाहता आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची संख्या भरणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालयाने अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार जाहिरात दिली होती. यात तज्ज्ञ डॉक्टर १, एमबीबीएस डॉक्टर ३, बीएएमएस १२, स्टाफ नर्सेस ४३, एक्स रे टेक्निशियन ६, एसीटी टेक्निशियन ६, सीटीस्कॅन टेक्निशियन ४ अशी एकूण ७५ पदे भरली गेली आहेत. तरीही डॉक्टरांची ५७ व इतर २० पदे रिक्त आहेत. यापैकी प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध निर्माता पदासाठी जास्त अर्ज आल्याने ही प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे.

आवश्यक आरोग्य मनुष्यबळ

तज्ज्ञ डॉक्टर -९

एमबीबीएस ३६

बीएएमएस १२

प्रयोगशाळा तंत्रज्ञ १०

औषध निर्माता १०

नुकत्याच झालेल्या भरतीत ७५ पदे भरण्यात आली आहेत; मात्र यात डॉक्टरांच्या विविध पदांसाठी उमेदवारच आले नव्हते. इतर पदांसाठीच उमेदवार आल्याने त्याच पदांची भरती झाली.

आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोट

कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांवर पडत असलेला ताण पाहता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी बी. आर. शर्मा यांनी जिल्हा रुग्णालयाने जिल्हास्तरावर अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे रिक्त पदे ही लवकरात लवकर भरण्यात येतील.

-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक

जिल्ह्यातील आतापर्यंतचे रुग्ण ६३९३

आतापर्यंत बरे झालेले रुग्ण ५५८८

आतापर्यंतचे कोरोना मृत्यू ८४

सक्रिय रुग्णांची संख्या ७२१

Web Title: Increased stress on ‘health’; 57 posts of doctors are vacant