हिंगोलीत आसामच्या मुख्यमंत्र्यांचा युवक काँग्रेसतर्फे निषेध

By विजय पाटील | Updated: January 23, 2024 15:32 IST2024-01-23T15:31:33+5:302024-01-23T15:32:27+5:30

शांततेत काढलेल्या यात्रेवर हल्ला करण्यासारखे भ्याड प्रकार

in Hingoli Youth Congress protest against Assam Chief Minister | हिंगोलीत आसामच्या मुख्यमंत्र्यांचा युवक काँग्रेसतर्फे निषेध

हिंगोलीत आसामच्या मुख्यमंत्र्यांचा युवक काँग्रेसतर्फे निषेध

हिंगोली : भारत जोडो न्याय यात्रेत आसाम राज्यात राहुल गांधी व जयराम रमेश यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा हिंगोलीत युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला. या राज्यातील मुख्यमंत्र्यांचाही निषेध केला.

माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानापासून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, जवाहर रोड, म. गांधी चौक, इंदिरा चौक, नांदेड नाका, या मार्गाने काढली. म. गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी शिक्षण सभापती संजय भैया देशमुख, रंजीत पाटील, यश देशमुख, अभिषेक बेंगाळ, पवन उपाध्याय, मदन शेळके, भास्कर बेंगाल, संतोष जगताप, बालाजी गावंडे, बापूराव पाटील, निरज देशमुख, भिमाशंकर सराफ, ऍड.अरगडे, दाजीबा पाटील, बालाजी क्षीरसागर, शेख नौमान, बाजीराव इंगोले, भिकाजी कीर्तनकार, आबेद अली, आकाश जगताप, शम्मी पठाण, साद अहमद, विशाल इंगोले आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी यश देशमुख म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे शांततेत काढलेल्या यात्रेवर हल्ला करण्यासारखे भ्याड प्रकार घडत आहेत. काँग्रेस एकजुटीने याविरोधात प्रतिकार करेल

Web Title: in Hingoli Youth Congress protest against Assam Chief Minister