शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

वसमतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी, कळमनुरीत दोन्ही शिवसेना,तर हिंगोलीत भाजप-उद्धव सेनेचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 11:53 IST

हिंगोली विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतून काँग्रेसचा दावा होता; परंतु ऐनवेळी या मतदारसंघात उद्धवसेनेने उमेदवाराची घोषणा केली.

हिंगोली : जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. वसमतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी, तर कळमनुरी मतदारसंघात दोन्ही शिवसेना रिंगणात उतरल्या आहेत. हिंगोलीत मात्र भाजपच्या विरोधात उद्धव सेनेने उमेदवार दिल्याने लढतीकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक आहेत. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर, हिंगोली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार मंडळी शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

हिंगोली विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे तान्हाजी मुटकुळे, तर महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेने रूपाली गोरेगावकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. परंपरागत काँग्रेसचा असलेला हा मतदारसंघ यावेळेस उद्धवसेनेने घेतला आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध उद्धवसेना अशी लढत होईल. परिणामी, येथील लढतीकडे लक्ष लागले आहे.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात उद्धवसेनेने माजी आमदार संतोष टारफे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात दोन्ही शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात आमनेसामने आहेत.

वसमत विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विद्यमान आमदार राजू नवघरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी निवडणूक रिंगणात आहेत. युती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. विद्यमान आमदार राजू नवघरे यांचे राजकीय गुरू अशी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची ओळख आहे. त्यामुळे या मतदारसंघात गुरू विरुद्ध शिष्य अशी लढाई रंगणार आहे.

जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले असून, वंचित बहुजन आघाडीसह प्रादेशिक पक्षांनीही निवडणुकांची तयारी केली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच खऱ्या अर्थाने लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे

हिंगोलीत उद्धवसेनेने खेचला काँग्रेसचा मतदारसंघ....हिंगोली विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतून काँग्रेसचा दावा होता; परंतु ऐनवेळी या मतदारसंघात उद्धवसेनेने उमेदवाराची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेसमधील नाराज इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकhingoli-acहिंगोलीkalamnuri-acकळमनुरीbasmath-acवसमत