हदगाव (जि. नांदेड): तालुक्यातील हडसणी फाट्याजवळ बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नातेवाईकाच्या मुलाचा वाढदिवस साजरा करून दुचाकीने परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव कारने (MH-12 KN-9149) त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत रेखाबाई भाऊराव नरवाडे, यशवंत भाऊराव नरवाडे आणि त्यांची बहीण अनुसया लोणारे (४०) यांचा जागीच मृत्यू झाला.
नशेत धुंद कारचालकाचा थरारप्राप्त माहितीनुसार, कारमधील सर्व प्रवासी नशेत होते. उमरखेडहून हदगावकडे येत असताना या कारने वाटेतही एका दुचाकीला धडक दिली होती. त्यानंतर हडसणी फाट्याजवळ नरवाडे कुटुंबाच्या दुचाकीला (MH-26 BU-2509) उडवले. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. मृतांना हदगावच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
पोलिसांची तत्परताघटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने मदत करत रुग्णालयात हलवले आणि उमरखेड येथील संबंधित कारचालक व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. अंबाळा येथील हॉटेल चालक भाऊराव नरवाडे यांचे हे कुटुंब असून, या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
Web Summary : A horrific accident near Hadgaon claimed three lives from one family. A speeding, drunk driver struck their motorcycle, instantly killing a mother, her son, and her sister. Police have arrested the driver and his companions. The village is in mourning.
Web Summary : हदगाँव के पास एक भयानक दुर्घटना में एक ही परिवार के तीन लोगों की जान चली गई। नशे में धुत एक तेज रफ्तार ड्राइवर ने उनकी मोटरसाइकिल को टक्कर मार दी, जिससे मौके पर ही एक माँ, उसके बेटे और उसकी बहन की मौत हो गई। पुलिस ने ड्राइवर और उसके साथियों को गिरफ्तार कर लिया है। गांव में शोक है।