Hingoli: रस्त्यावर रक्ताचा सडा! टिपरच्या धडकेत दुचाकीचे तुकडे, दोन तरुणांचा दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:41 IST2025-10-09T11:40:23+5:302025-10-09T11:41:15+5:30

वसमत-कुरुंदा मार्गावरील घटना, आसेगाव आणि नांदुसा येथील दोन तरुणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Hingoli: Blood stains on the road! Two youths meet tragic end after being hit by a tipper, bike shattered into pieces | Hingoli: रस्त्यावर रक्ताचा सडा! टिपरच्या धडकेत दुचाकीचे तुकडे, दोन तरुणांचा दुर्दैवी अंत

Hingoli: रस्त्यावर रक्ताचा सडा! टिपरच्या धडकेत दुचाकीचे तुकडे, दोन तरुणांचा दुर्दैवी अंत

​वसमत (हिंगोली) : वसमत-कुरुंदा मार्गावरील उघडी नदीजवळ बुधवारी (८ ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास टिपर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वसमत-कुरुंदा मार्गावरील उघडी नदीजवळ हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा अक्षरशःचक्काचूर झाला. या अपघातात दुचाकीवरील सतीष गंगाधर स्वामी (वय ३५,रा. आसेगाव) आणि जनकवाडे (रा. नांदुसा, जि. नांदेड) हे दोघे गंभीर जखमी झाले.​घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले होते.

मात्र, ​वसमत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथे उपचारादरम्यान या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेप्रकरणी गुरुवारी (९ ऑक्टोबर) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title : हिंगोली: टिपर की टक्कर में दो युवकों की मोटरसाइकिल दुर्घटना, मौत

Web Summary : हिंगोली के पास एक दुखद दुर्घटना में दो लोगों की जान चली गई। एक टिपर ट्रक ने मोटरसाइकिल को टक्कर मार दी, जिससे दो युवकों की मौत हो गई। दुर्घटना वसमत-कुरुंदा मार्ग पर हुई। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Hingoli: Tipper Truck Collision Kills Two Young Men on Motorcycle

Web Summary : A tragic accident near Hingoli claimed two lives. A tipper truck collided with a motorcycle, killing two young men. The accident occurred on the Vasmat-Kurunda road. Police are investigating.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.