शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

सरपणासाठी गेलेल्या नातीसह आजोबाचा विहिरीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 17:22 IST

नात विहिरीत पडल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात आजोबासह नातीचाही पाण्यात बुडून मृत्यू

ठळक मुद्देमुलीचे आई-वडील मुंबईत अडकले

कनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील बोडखी येथे शेतशिवारात सरपण आणण्यासाठी गेलेली नात विहिरीत पडल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात आजोबासह नातीचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताची घटना घडली. 

बोडखी येथील  सोनाली सुभाष धवसे (११) व तिची मैत्रिण रितीका या दोघी बोडखी शिवारातील शेतात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. सोनालीला तहान लागल्याने ती पाणी पिण्याकरीता विहिरीवर गेली. आधीच पडक्या असलेल्या विहिरीत उतरल्यानंतर तिचा पाय घसरून आत पडली. ती पाण्यात बुडत असल्याने रितीकाने पाहिले. तिने जवळच्याच शेतात असलेल्या चुलत आजोबा मुकिंदा लोडबा धवसे (६०) यांना सांगितले. आजोबांनी धावत जावून विहिरीत उडी टाकली. परंतु त्यांना दमाचा आजार असल्याने तेही पाण्यात बुडाले व मरण पावले. या घटनेची माहिती गावात कळताच गावातील सर्व ग्रामस्थांनी शेतातील विहिरीकडे धाव घेवून पाण्यात बुडालेल्या नातीला व आजोबाला बाहेर काढले या घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी ग्रामीणचे जमादार नंदू मस्के दाखल झाले होते. 

मुलीचे आई वडील मुंबईत अडकले सदरील घटनेतील मृत  सोनाली धवसे हिचे आई-वडील सध्या मुंबई येथे आहेत. बांधकाम कामगार म्हणून ते मुंबईला गेल्यानंतर लॉकडाऊनमुळे त्यांना परतता आले नाही. मुलीला आजीकडे सोडून ते मुंबईला गेले होते. मात्र आता त्यांना मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी येणे अवघड बनले आहे. तर मुकिंदा लोडबा धवसे यांचा मुलगा नारायणगाव येथे आहे. त्यांनीही आई-वडिलांना गावी ठेवून कामासाठी स्थलांतर केले होते. त्यांच्या मुलालाही नारायणगाव येथून येता येईल की नाही, हा प्रश्न आहे.

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोली