अखेर बेपत्ता विद्यार्थी सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:14 IST2018-09-12T00:14:09+5:302018-09-12T00:14:24+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी येथील सरस्वती माध्यमिक आश्रमशाळेचा विद्यार्थी ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आश्रमाशाळेतून बाहेर पडला होता.

अखेर बेपत्ता विद्यार्थी सापडला
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी येथील सरस्वती माध्यमिक आश्रमशाळेचा विद्यार्थी ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आश्रमाशाळेतून बाहेर पडला होता. कृष्णा सदाशिव साबळे असे सदरील विद्यार्थ्यांचे नाव असून दहावीच्या वर्गात तो शिकत आहे. ३ सप्टेंबर रोजी तो कुणालाही न सांगता अचानक गायब झाला. त्यानंतर नातेवाईक व शिक्षकांनी शोध घेतला असता तो कुठेही सापडला नाही. त्यानंतर मुख्याध्यापक किसन कंगणे यांच्या फिर्यादीवरून हट्टा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सपोनि गुलाब बाचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि ज्ञानोबा मुलगीर यांनी तपास करून त्यांच्या मूळ गावी जलालदाभा येथे जाऊन भेट घेतली. हाती आलेल्या माहिती आधारे परभणी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला असता तो परत गावाकडे येत असल्याची माहिती मिळताच कृष्णाला पोलिसांनी १० सप्टेंबर रोजी गाठून नातेवाईकांच्या स्वाधीन केले. यावेळी पोउपनि ज्ञानोबा मुलगीर, सचिन शिंदे, सचिन चाबूकस्वार, इमरान कादरीसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.