शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कुंभार समाजाचे १५ कुटुंबे उपासमारीला जातात सामोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:30 IST

हिंगोली : उन्हाळ्याचे तीनच महिने कुंभार समाजाला उदरनिर्वाहासाठी महत्त्वाचे असतात. परंतु, कोरोनाचे रुग्ण वाढल्याने जिल्हा प्रशासनाने टाळेबंदी केली आहे. ...

हिंगोली : उन्हाळ्याचे तीनच महिने कुंभार समाजाला उदरनिर्वाहासाठी महत्त्वाचे असतात. परंतु, कोरोनाचे रुग्ण वाढल्याने जिल्हा प्रशासनाने टाळेबंदी केली आहे. याचा सर्वाधिक फटका कुंभार समाजाला बसल्याची व्यथा कुंभार व्यावसायिकांनी मांडली. सद्य:स्थितीत कुंभार समाजाचे १५ कुटुंबे उपासमारीला सामोरे जात आहेत.

जिल्ह्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. हे पाहून जिल्हा प्रशासनाने १ ते ७ मार्च आणि २६ मार्च ते ४ एप्रिल अशी दोनवेळा टाळेबंदी केली आहे. टाळेबंदीला कुंभार समाजाचा विरोध नाही. परंतु, माठांचा व्यवसाय फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असा तीनच महिने चालत असल्याने तोही सद्य:स्थितीत बंदच आहे. गल्ली, वाॅर्डातही जावून माठ विकणे अवघड जाते. त्यामुळे दरवर्षी शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, बसस्थानक परिसर आदी ठिकाणी कुंभार समाज माठांची विक्री करतो. परंतु, गत दोन वर्षांपासून माठांची विक्री होत नाही. परिणामी उपासमारीला कुंभार समाज तोंड देत आहे. हिंगोली शहरातील गवळीपुरा येथे जवळपास १५ कुटुंबांकडे पिढीजात माठांचा व्यावसाय आहे. यावरच कुटुंबाचा गाडा चालतो. या कुटुंबात ३५ ते ४० लहान-लहान लेकरे आहेत. दिवसाकाठी माठ विक्रीतून चारशे रुपये पदरात पडायचे तेही आता पडेनासे झाले आहेत.

२३ मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीने सर्वत्र शिरकाव केला. त्यावेळेसपासूनच कुंभार समाजाची उपासमार सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यापासून माठांची बुकींग होत असते. परंतु, यावेळेस कोरोनामुळे बुकींगही झाली नाही. घर शोधत कोणताही ग्राहक आमच्याकडे येत नाही. त्यामुळे आम्हाला चौकामध्ये किंवा वर्दळीच्या रस्त्यावर माठ विकावे लागतात. परंतु, कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रस्त्यावर बसणेही कठीण झाले आहे. मोठी माणसे उपाशी राहू शकतात. परंतु, लहान मुलांना ते शक्य नाही. लेकरे उपाशीपोटी झोपलेली पहावेसे वाटत नाही, अशीही प्रतिक्रिया कुंभार समाजाने व्यक्त केली.

माठांची केली उतरंड.....

माठ तयार करूनही काही उपयोग होत नाही. विक्रीच बंद असल्याने घरात, दारात उतरंड करावी लागत आहे. गवळीपुरा शहराचा जुना भाग आहे. या ठिकाणी कुंभार समाजाची पंधरा ते वीस घरे आहेत. पाच पिढ्यांपासून आम्ही हाच व्यवसाय करत आलो आहोत. हिंगोली शहरासह अकोला, परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळ आदी ठिकाणी कुंभारमंडळी दोन पैसे मिळावेत म्हणून माठ विक्रीसाठी घेऊन जातात. परंतु, कोरोना संसर्ग वाढल्याने परजिल्ह्यांत जाता येत नाही. तेव्हा शासनाने कुंभारांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ज्ञानेश्वर पेरीया, गोपाल पेरीया, राधेश्याम पेरीया, नंदू पेरीया, गणेश पेरीया, प्रकाश पेरीया, सचिन बनचरे यांनी शासनाकडे केली आहे.

फोटो नंबर ७