हिंगोलीत सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 18:23 IST2018-09-12T18:21:50+5:302018-09-12T18:23:48+5:30
वसमत तालुक्यातील बोरी सावंत येथील शेतकरी रत्नपारख सिताराम सावंत आत्महत्या केली.

हिंगोलीत सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
हिंगोली : वसमत तालुक्यातील बोरी सावंत येथील शेतकरी रत्नपारख सिताराम सावंत (४०) यांनी सततच्या नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.
रत्नपारख यांच्या शेतातील कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने ते सतत चिंतेत होते. यातूनच त्यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज रत्नपारख यांचे भाऊ अनंता सावंत हे नेहमी प्रमाणे सकाळी शेतात गेले. यावेळी त्यांना रत्नपारख यांनी गळफास घेतल्याचे निर्दशनास आले. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. सपोनी गुलाब पाचेवाड यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पुढील तपास पोलीस हवालदार बबन राठोड व राजू गट्टे करत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई व दोन भाऊ असा परिवार आहे.