खळबळजनक! वसमत शिवारात २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला
By विजय पाटील | Updated: July 28, 2023 13:41 IST2023-07-28T13:41:24+5:302023-07-28T13:41:32+5:30
वसमत शहरातील तिरुपतीनगरमध्ये सार्वजनिक ठिकाणी आढळला मृतदेह

खळबळजनक! वसमत शिवारात २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला
वसमत (जि. हिंगोली): शहरातील भोरीपगावकडे जाणाऱ्या तिरुपतीनगर येथे २८ वर्षीय तरुणाचा शुक्रवारी पहाटे मृतदेह आढळला आहे. घटनास्थळी शहर पोलिसांनी भेट देत पंचनामा केला. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.
वसमत शहरातील तिरुपतीनगरमध्ये सार्वजनिक ठिकाणी २८ जुलै रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान किरण मोरेवार (वय २८, रा. तिरुपती नगर) या तरुणाचा मृतदेह आढळला. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधणापोड, जमादार गजानन भोपे आदींनी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेळके यांनी भेट दिली. या प्रकरणी वृत्त लिहिपर्यंत तरी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. किरण मोरेवार याच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप कळाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.