शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

औंढ्यात राज्य रस्त्यावर अतिक्रमण

By admin | Updated: August 17, 2014 00:21 IST

औंढा नागनाथ : येथे परभणी-हिंगोली जाणाऱ्या राज्य महामार्गावर दोन्ही बाजूने अतिक्रमण झाले असल्याने रस्ता अरूंद झाला आहे.

औंढा नागनाथ : येथे परभणी-हिंगोली जाणाऱ्या राज्य महामार्गावर दोन्ही बाजूने अतिक्रमण झाले असल्याने रस्ता अरूंद झाला आहे. औंढा येथे पर्यटनस्थळ असल्याने नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. औंढा येथे हिंगोली- परभणी रस्त्यावर हुतात्मा स्मारकापासून ते नवीन बसस्थानकासमोर हॉटेल, पाणपट्टी, मिठाईवाल्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूस आपली दुकाने थाटली आहे. रस्ता सोडून ५ फुट अंतरावरच दुकाने असल्याने दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी राहतात. पर्यटक निवासापुढे देशी दारूचे दुकान असल्याने येथे मोठ्या प्रमाणात रस्त्यालगतच उघड्यावर मांसविक्री होत आहे. परिणामी दोन्ही बाजूने रस्ता अरूंद झाल्याने रस्त्याच्या कडेला खोदलेल्या नाल्या बुजल्या आहेत. त्यामुळे अल्पश: पावसानेही संपूर्ण पाणी रस्त्यावर येत असल्याने येथील रहिवासी व पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. बांधकाम विभागाला याबाबत अनेकवेळा लेखी व तोंडी सूचना देऊनही अतिक्रमण काढण्यात आलेले नाही. परिणामी पर्यटकांना या अरूंद रस्त्यावरून मंदिराकडे जावे लागते. त्यामुळे या अरूंद रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)