वसमत (जि. हिंगोली): हिंगोली जिल्ह्याच्या वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्याला बुधवारी दुपारी ३:३६ वाजता भूकंपाचा मध्यम स्वरूपाचा धक्का जाणवला. जमिनीतून अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे आणि हादऱ्यांमुळे ग्रामस्थांची एकच पळापळ झाली. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यात बसलेला हा तिसरा धक्का असून वारंवार जमीन हादरत असल्याने नागरिक दहशतीखाली आहेत.
३:३६ मिनिटांनी मोठा आवाजबुधवारी दुपारी पांगरा शिंदे, वापटी, कुरुंदा, कुपटी या गावांसह औंढा तालुक्यातील गवळेवाडी आणि सारंगवाडी परिसरात जमिनीतून गुढ आवाज आला. हा आवाज इतका मोठा होता की लोक भीतीने घराबाहेर मोकळ्या मैदानात धावत सुटले. सुदैवाने आजच्या धक्क्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्नयापूर्वी ११ एप्रिल रोजी झालेल्या धक्क्यांमुळे पांगरा शिंदे येथील ८० हून अधिक घरांना तडे गेले होते. आजच्या धक्क्याने जुन्या तड्यांमध्ये वाढ झाल्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप अधिकृत रिश्टर स्केलची नोंद प्राप्त होणे बाकी आहे. मात्र, या भागाची भूगर्भशास्त्रज्ञांनी तातडीने पाहणी करावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Web Summary : Vasmat, Hingoli experienced another earthquake, the third this April. A loud noise and tremors caused panic. No casualties reported. Previous tremors on April 11th damaged homes, with fears of further damage. Authorities urge caution; geological survey requested.
Web Summary : हिंगोली के वसमत में एक और भूकंप, अप्रैल में तीसरा। तेज आवाज और झटकों से दहशत। कोई हताहत नहीं। 11 अप्रैल के पिछले झटकों से घरों को नुकसान, और नुकसान की आशंका। अधिकारियों ने सावधानी बरतने की सलाह दी; भूवैज्ञानिक सर्वेक्षण का अनुरोध किया गया।