शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

दोन वर्षांत वाढणार जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:39 IST

जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र येत्या दोन वर्षात १५ हजार करण्याचे उद्दिष्ट राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिले आहे. त्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु असून, जलसंपदा विभागाच्या वतीने एकूण पाच तलावांचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी एका लावाचे काम पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर असल्याने यात २.७३ दलघमी पाणीसाठवण होणार असून, ४९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तर इतर चार तलावांचेही काम येत्या काही दिवसांत सुरु होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र येत्या दोन वर्षात १५ हजार करण्याचे उद्दिष्ट राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिले आहे. त्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु असून, जलसंपदा विभागाच्या वतीने एकूण पाच तलावांचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी एका लावाचे काम पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर असल्याने यात २.७३ दलघमी पाणीसाठवण होणार असून, ४९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तर इतर चार तलावांचेही काम येत्या काही दिवसांत सुरु होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली आहे.जिल्ह्याचे एकूण ४ लाख २१ हजार लागवडीखाली क्षेत्र असून, ३६ हजार ७०० एवढे सिंचनाखाली क्षेत्र आहे. तर १० हजार ६१५. ७५ हेक्टरवर फळबागा आहेत. मात्र पाणीच नसल्याने बऱ्याच शेतकºयांनी फळबागा तोडून टाकल्या आहेत. आता दोन वर्षांत जिल्ह्याचे सिंचनाचे क्षेत्र वाढणार आहे. यामध्ये राज्यपालांनी विशेष करुन लक्ष घातल्यामुळे पाणीपातळी वाढविण्यासाठी प्रशासन लक्ष देत आहे. आजघडिला जलसंपदा विभागाच्या वतीने हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण, अंभेरी, हळदवाडी, बोराळा, पिंपळखुटा या पाच तलावांचे काम हाती घेतलेले आहे. यापैकी नवलगव्हाण येथील तलावाचे काम अंतिम टप्यात आल्याने यात जवळपास ४९० हेक्टर शेती ओलीताखाली येणार आहे. तर अंभेरी आणि हळदवाडी येथील तलावाचे काम मावेजामुळे अडले होते. त्याची अजून भूसपांदन प्रक्रिया सुुरु आहे.ती प्रक्रिया पूर्ण होताच शेतकºयांना मावेजा देऊनच तलावाच्या कामास सुरुवात केली जाणार आहे. हे दोन तलाव पूर्ण झाल्यास हळदवाडी तलावात १.६८ द.ल.घ.मी तर अंभेरी येथील तलावात १.७७ द. ल. घ. मी पाणी साठवण होऊन ५८६ हेक्टर जमिनीचे सिंचन क्षेत्र वाढणार आहे.पिंपळखुटा येथील प्रकल्प चार प्रकल्पापेक्षा मोठा असल्याने यात ११. २० द.ल.घ.मी एवढी पाणी साठवण होणार असून, १ हजार ४४१ हेक्टर सिंचनक्षेत्र वाढणार आहे.या तलावाचे मोजमाप आॅक्टोबरमध्ये करणे प्रस्तावित आहे. तर बोराळा येथील तलावाचे जुलैमध्ये मोजमाप होऊन शेतकºयांना मावेजा मिळाल्यानंतर गतीने कामास प्रारंभ केला जाणार आहे.जलसंपदा विभागाकडे मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध असून, केवळ भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होणेच गरजेचे आहे. जिल्ह्याचा सिंचनाचा टक्का वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी लक्ष दिल्याने आठ ते दहा वर्षांपासून रेंगाळलेल्या प्रकल्पाच्या कामांना गती आली असल्याचे कार्यकारी अभियंता व्ही. एम. मगर यांनी सांगितले.मागील अनेक वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यात पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण झालेले आहे. पाणीच नसल्याने अनेक शेतकºयांनी आपल्या शेतजमिनी पडिक ठेवल्या आहेत. मात्र आता मोठ- मोठे प्रकल्प होणार असल्याने पुन्हा लागवडीखाली क्षेत्र वाढणार आहे. तर पूर्णा नदीवर औंढा तालुक्यात पोटा येथे,वसमत तालुक्यात जोडपिंपरी आणि हिंगोली तालुक्यात पिंपळखुटा येथे उच्चपातळी बंधारे प्रस्तावित आहेत. तेथे जवळपास २७ द.ल.घ.मी. पाणीसाठा होवून ४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. संकल्प चित्रसंघटना नाशिक येथे संकल्पनाचे काम सुरु आहे.पोटा बंधाºयाच्या संकल्पनास संघटनेची मंजुरीही मिळालेली आहे. तर इतर दोनचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच सुकळी, डिग्रस कºहाळे येथेही दोन साठवण तलाव होणार आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणी