अपघातात महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:34 IST2018-12-25T00:33:44+5:302018-12-25T00:34:06+5:30
कुरूंदा ते रेडगाव रस्त्यावर एका ४५ वर्षीय महिलेचा अपघातात मृत्यू झाला असून, या अपघाताचा अद्याप उलगडा झालेला नव्हता.

अपघातात महिलेचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : कुरूंदा ते रेडगाव रस्त्यावर एका ४५ वर्षीय महिलेचा अपघातात मृत्यू झाला असून, या अपघाताचा अद्याप उलगडा झालेला नव्हता. दुचाकी चालविणारा बेशुद्ध अवस्थेत आहे. कुरूंदा-रेडगावमार्गे नातेवाईकांची भेट घेवून औंढा तालुक्यातील सावरखेडा येथे दुचाकीवरून घेऊन जाताना बागल पार्डीजवळ अपघात घडल्याने राधाबाई पांडुरंग सावंत (४६) ही महिला जागीच मरण पावली. तर त्यांचा मुलगा सध्या बेशुद्ध असल्याने त्याच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहे. नेमका अपघात कसा घडला? याचा अद्याप उलगडा झाला नव्हता. यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. घटनास्थळी सपोनि शंकर वाघमोडे, जमादार बी.टी. केंद्रे यांनी भेट दिली. उशिरापर्यंत कुरूंदा पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.