सासरच्या ५ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:21 IST2018-12-20T00:20:55+5:302018-12-20T00:21:09+5:30
सेनगाव तालुक्यातील उमरदरीत पती पत्नीच्या भांडणात महिलेच्या डोक्यात लकडाने मारहाण केल्याने तिचा जागीच मृत्य झाल्याची घटना १८ डिसेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध मंगळवारी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सासरच्या ५ जणांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : सेनगाव तालुक्यातील उमरदरीत पती पत्नीच्या भांडणात महिलेच्या डोक्यात लकडाने मारहाण केल्याने तिचा जागीच मृत्य झाल्याची घटना १८ डिसेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध मंगळवारी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सेनगाव तालुक्यातील उमरदरीत विकास पोले (२८) व मीनाक्षी पोले हे दोघे शेतात तूर कापणी करण्याच्या कामासाठी गेले होते. या दोघांमध्ये शेतातील आंब्याच्या झाडा खाली भांडण झाले. यावेळी आरोपी विकास पोले याने पत्नी मिनाक्षीच्या डोक्यात लकडाने मारहाण केली. त्यात ती जागीच मरण पावली.
माहेरहून गाडी घेण्यासाठी पैशांची मागणी करुन पती विकास पोले, सासरा श्यामराव पोले, सासू शांताबाई पोळे, दिर बंडू पोले, बालाबाई पोले हे सतत छळ करुन मारहाण करत असल्याचे मयत महिलेचा भाऊ रमेश कोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फियार्दीवरुन औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात सासरच्या पाच जणांविरुद्ध खुनाच्या गुन्ह्यासह इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. बुधवारी सकाळी हिंगोली जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मुलीकडील मंडळींनी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली होती. परंतु पोलीस उपधीक्षक सिद्धेश्वर भोरे व पोनि कुंदनकुमार वाघमारे यांनी आरोपीला अटक केल्याचे सांगितल्यावर प्रेत ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.