कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचे डोस जिल्ह्याला प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:31 IST2021-05-06T04:31:47+5:302021-05-06T04:31:47+5:30

हिंगोली : जिल्ह्यातील कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस संपल्यामुळे दुसरा मिळतो की नाही या चिंतेत नागरिक होते. जिल्हा प्रशासन ...

Covishield, dose of covacin received by the district | कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचे डोस जिल्ह्याला प्राप्त

कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचे डोस जिल्ह्याला प्राप्त

हिंगोली : जिल्ह्यातील कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस संपल्यामुळे दुसरा मिळतो की नाही या चिंतेत नागरिक होते. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने पाठपुरावा केल्यामुळे दोन्ही डोस जिल्ह्याला प्राप्त झाले असून, ६ मेपासून सर्वांना लस दिली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी प्रेमकुमार ठोंबरे यांनी दिली.

३० एप्रिल रोजी पाच हजार कोविशिल्डचे डोस जिल्ह्यासाठी प्राप्त झाले होते. मिळालेल्या पाच हजार डोसमधून वसमत, औंढा, सेनगाव व कळमनुरी या तालुक्यांना प्रत्येकी एक हजार डोस देण्यात आले. याचबरोबर कोव्हॅक्सिनचे ९६० डोस जिल्ह्यासाठी मिळाले होते. लसींचा साठा ५ मे रोजी कमीच होता. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातच लसीकरण सुरू होते. बाकी ठिकाणी मात्र लसीकरण बंद होते. दोन्ही लसींसाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य विभागाने शासनाकडे पाठपुरावा केला होता.

पाठपुराव्यानंतर जिल्ह्यासाठी कोविशिल्ड २५ हजार, तर कोव्हॅक्सिन आठ हजार डोस प्राप्त झाले आहेत. ६ मे रोजी जिल्ह्यातील ३३ केंद्रांवर म्हणजे हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव आणि औंढा येथे लसीकरण सुरू केले जाणार आहे. लसीकरणाच्या वेळी कोणीही गडबड करू नये, शांततेने लसीकरण करून घ्यावे, जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

मास्क घालूनच बाहेर पडावे

जिल्ह्यासाठी दोन्ही लस उपलब्ध झाल्या आहेत. ६ मे रोजी जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर लसीकरण पूर्वीप्रमाणे सुरू राहाणार आहे. बाहेर पडताना नागरिकांनी मास्कचा वापर करावा. ज्यांचा दुसरा डोस राहिला आहे त्यांनी जवळच्या केंद्रावर लसीकरण करून घ्यावे. लसीकरण केंद्रावर गर्दी न करता शांततेने लस घ्यावी. कोव्हॅक्सिन हे तालुक्याच्या ठिकाणी, तर कोविशिल्ड हे तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी देण्यात येणार आहे.

Web Title: Covishield, dose of covacin received by the district