कोरोनाचा कहर सुरूच : नव्याने ५५ रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:28 IST2021-03-08T04:28:27+5:302021-03-08T04:28:27+5:30

तसेच हिंगोली परिसरात आरटीपीसीआरद्वारे तपासणी केली असता ४३ रुग्ण आढळून आले. यात शेनगाव ५, आनंदनगर १, ग्रामीण पोलीस ठाणे ...

Corona plague continues: 55 new patients found | कोरोनाचा कहर सुरूच : नव्याने ५५ रुग्ण आढळले

कोरोनाचा कहर सुरूच : नव्याने ५५ रुग्ण आढळले

तसेच हिंगोली परिसरात आरटीपीसीआरद्वारे तपासणी केली असता ४३ रुग्ण आढळून आले. यात शेनगाव ५, आनंदनगर १, ग्रामीण पोलीस ठाणे १, नाईकनगर ३, आदर्श कॉलनी १, एनटीसी ६, खांबाळा १, रामाकृष्ण कॉलनी १, समगा १, सरस्वतीनगर १, हेमराज गल्ली २, जिजामातानगर १, अंतुलेनगर ९, शास्त्रीनगर १, वाशीम १, मंगळवारा १, पारोळा १, छत्रपतीनगर १, रिसाला बाजार १, शिवराजनगर २, माळहिवरा १, पेन्शनपुरा १ रुग्णाचा समावेश आहे. औंढा २, तसेच कळमनुरीतील गजानन नगरातील एक रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, रविवारी ४० रुग्ण बरे झाले असून, यात जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणारे २१, कळमनुरी कोरोना केअर सेंटरमधील ७, लिंबाळा कोरोना केअर सेंटरमधील ३, औंढा कोरोना केअर सेंटरमधील ९ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत ४ हजार ४०३ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ३ हजार ९८२ रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला ३५८ रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत ६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार घेणाऱ्या २२ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तसेच ४ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

Web Title: Corona plague continues: 55 new patients found