शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे हिरावले ४० बालकांचे पालकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST

हिंगोली : कोविडमुळे जिल्ह्यातील ४० बालकांचे पालकत्व हिरावले असून, यामध्ये ३१ जणांनी वडील, ८ जणांनी आई, तर एका बालकाने ...

हिंगोली : कोविडमुळे जिल्ह्यातील ४० बालकांचे पालकत्व हिरावले असून, यामध्ये ३१ जणांनी वडील, ८ जणांनी आई, तर एका बालकाने आई आणि वडील दोघेही गमावले असून, या बालकांच्या योग्य बालसंगोपनासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी दिली. कोविडमुळे पालकत्व गमावलेल्या बालकांची काळजी व सरंक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, ॲड. वैशाली देशमुख, सरस्वती कोरडे आणि बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांची उपस्थिती होती.

यावेळी शिंदे यांनी जिल्ह्यात पालकत्व गमावलेल्या ४० बालकांचा शोध घेतल्याचे सांगितले. ही सर्व बालके आपले काका-काकू, मामा-मामी आणि आजी-आजोबांकडे सध्या वास्तव्यास आहेत. भविष्यात या बालकांचे नातेवाईक आपल्या जवळ ठेवण्यास तयार नसल्यास त्यांना बालसंगोपनगृहात ठेवून त्यांचे संगोपन करण्यात येईल, अशी माहिती दिली.

यावेळी जयवंशी म्हणाले की, कोरोनामुळे अनेक बालकांनी आपले पालकत्व गमावले आहे. यात एक किंवा दोन्ही पालक गमावलेले, तसेच ज्या बालकांनी कोरोनाशिवाय इतर कारणांमुळे आपले पालकत्व गमावले असेल त्यांचीही माहिती संकलित करावी, तसेच सदर माहिती दैनंदिन पोर्टलवर अद्ययावत करावी. ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले असतील त्यांचे बालसंगोपन योजनेतून संगोपन करावे.

एकच पालक बाधित असल्यास मुलांना सांभाळा

ज्या बालकांचे एकच पालक आहे आणि ते विलगीकरण किंवा रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत, अशांची माहिती दररोज जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घ्यावी, तसेच या कालावधीसाठी त्यांचे संगोपन करावे. ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा बालकांना पोलीस विभागाने संरक्षण उपलब्ध करून द्यावे. त्यांचे शोषण होणार नाही याचीही दक्षता घ्यावी. लहान मुलांवर अन्याय किंवा अत्याचार होत असल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी चाइल्ड हेल्पलाइन १०९८ या हेल्‍पलाइनवर संपर्क करावा, असे आवाहनही जयवंशी यांनी केले.