शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

काँग्रेसकडून तीन जिल्हा परिषद सदस्यांचा अपात्रतेचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 1:14 PM

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीच्या वेळी काँग्रेसमध्ये गटा-तटांप्रमाणेच फूट पडली होती.

ठळक मुद्देगोंधळानंतर काँग्रेसकडून कार्यवाही जिल्हा कचेरीत प्रस्ताव दाखल

हिंगोली : जिल्हा परिषदेत रोज नव्या वादांना तोंड फुटू लागले आहे. दोनच दिवसांपूर्वी विषय समित्यांचे खातेवाटप करण्याच्या सभेत झालेल्या गोंधळानंतर आता काँग्रेसच्या वतीने माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर गटाच्या तीन सदस्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हा कचेरीत दाखल केला आहे. यावर अजून पुढील प्रक्रियेला प्रारंभ झाला नसला तरीही ही बाब आता चर्चेचा विषय ठरत आहे.

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीच्या वेळी काँग्रेसमध्ये गटा-तटांप्रमाणेच फूट पडली होती. माजी खा.राजीव सातव यांचा सात जणांचा गट वेगळा तर माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा तीन जणांचा गट वेगळा राहिला. यात सातव गटाच्या मंडळीला बाजूला सारून शिवसेनेने गोरेगावकर गटाला एक सभापतीपद देत सर्व बाबी आपल्या मनासारख्या करून घेण्यात यश मिळविले आहे. गोरेगावकर गटाचे बाजीराव जुंबडे यांना सभापतीपद मिळाले आहे. आता जुंबडे यांनी शिक्षण पदावर दावा केला असला तरीही तेथे काँग्रेस, राष्ट्रवादी व सेनेतील असंतुष्टांनी राष्ट्रवादीच्या रत्नमाला चव्हाण यांच्या पाठीशी बळ उभे केले. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी सभा तहकूब करावी लागली होती. त्यामुळे माजी खा.सातव यांच्या गटाचा विरोध स्पष्ट दिसत होता.

आता काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्या सूचनेवरून सभापती बाजीराव जुंबडे, माजी सभापती संजय देशमुख व चंद्रभागा देवराव जाधव या तीन सदस्यांनी पक्षाचा व्हीप पाळला नसल्याच्या कारणावरून त्यांना अपात्र घोषित करण्याच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला आहे.या प्रस्तावावर आता पुढील कारवाई काय होईल ते सुनावनीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी महसूल क्रीडा स्पर्धांमुळे हे प्रकरण लवकर सुनावणीला येईल, अशी शक्यताही दिसत नाही. मात्र या प्रकाराची चर्चा तेवढी रंगणार असल्याचे दिसते.

जिल्हा परिषदेत एकच चर्चाजिल्हा परिषदेतील वितंडवाद सुरू असले तरीही त्यावरील चर्चाही मात्र तेवढीच सामंजस्याने होते. सभागृहात एकमेकांना विरोध करणारी मंडळी सभागृहाबाहेरील चर्चेत मात्र तेवढीच खिलाडीवृत्ती ठेवून व दिलखुलासपणे चर्चेत सहभागी होताना दिसते.४मागील दोन दिवसांपासून जि.प.तील तिढा कसा सुटणार व कोण सोडविणार, यावरुन चर्चा रंगत आहे. मात्र तोपर्यंत बिनखात्याचे सभापती अन् वादाला फोडणी देणारी बाहेरची मंडळी सर्वांचीच अस्वस्थता वाढवून जात असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषदcongressकाँग्रेस