शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीही बंद : बारदान्यासह उद्दिष्ट संपले, तूर उत्पादकांना पैशांची चिंता

By admin | Updated: June 11, 2017 19:12 IST

शेतकरी सलग तीन वर्षापासून नेहमीच विविध संकटाना तोंड देत आहे. यंदा तर मुबलक प्रमाणात तुरीचे उत्पादन होऊनही कधी तूर

ऑनलाइन लोकमत हिंगोली, दि. 11 -  शेतकरी सलग तीन वर्षापासून नेहमीच विविध संकटाना तोंड देत आहे. यंदा तर मुबलक प्रमाणात तुरीचे उत्पादन होऊनही कधी तूर विक्रीची तर कधी तुरीचे पैसे मिळविण्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अजूनही २ हजारांवर शेतकऱ्यांना तूर विक्रीचा छदामही मिळाला नाही. तर बारादाना व उद्दिष्टही संपल्याने उर्वरित तुरीचे मातेरे होण्याची भीती कायम आहे. तूर खरेदीबाबत शासन वेगवेगळे आदेश काढत असल्याने, मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. केंद्र सरकारने दीड लाख टन तूर खरेदीचा आदेश काढला होता. आता तेवढे उद्दिष्टही पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. आता हिंगोलीतील बारदानाही संपल्याने तूर खरेदीला बे्रक लागला आहेत. नवीन शेतकऱ्यांचा निदान माल तरी घरी आहे. मात्र आतार्यंत या केंद्रावर तूर दिल्यावर नाफेड व खरेदी विक्री संघाने शेतकऱ्यांच्या हाती छदामही दिला नाही. ३० एप्रिल ते ८ मेपर्यंत नाफेडने खरेदी केली होती. या तुरीसह १६ ते २६ मेपर्यंत ६ हजार ८३० क्विंटल ५० किलो आणि २९ मे ते ९ जूनपर्यंत ९ हजार २२६ क्विंटल ५० किलो खरेदी विक्री संघाने तूर घेतली. मात्र या तुरीचे शेतकऱ्यांना अजूनही धनादेश दिलेले नाहीत. त्यातच कृउबाने नोंदणीचा फंडा वापरुन शेतकऱ्यांना शांत केले होते. आता उद्दिष्टही संपल्याने पुढील आदेशाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागत आहे. अधून-मधून पाऊस येत असल्याने, खरिपाच्या पेरणीसाठी आशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतु पैसेच नसल्याने अडचण निर्माण झाली. आजघडीला तूर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ८ कोटी १० लाख ८७ हजार रुपयांची गरज असल्याचे खरेदी विक्री संघाच्या वतीने सांगितले. उसनवारीवर जोर : शेतकऱ्यामध्ये संभ्रम मागील वर्षी खरिपात निर्सगाने शेतकऱ्यांना साथ दिल्यामुळे तुरीचे उत्पादन चांगले झाले. परंतु तूर विकण्यासाठी मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागता. बाहेर भाव नाही अन् हमीभावाच्या ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नाही. विकलेल्या मालाचे पैसे नाहीत. त्यामुळे उसनवारी केल्याशिवाय पर्याय नाही. मध्यंतरी खरेदी विक्री संघाला नाफेड विभागाकडून १ लाख रुपये मिळाले होते. यामध्ये हमाली व इतर खर्चच पूर्ण झाला. मिळालेल्या रक्कमेतून शेतकऱ्यांना पैसेच मिळू न शकल्याने शेतकरी संभ्रामवस्थेत सापडले आहेत. आदेशाकडे लागले लक्षकृउबाकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बोलाविले जात होते. परंतु उद्दिष्ट पूर्ण झाल्याने पुढील आदेश येईपर्यंत तूर खरेदी बंद राहणार असल्याचे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गोेविंद भवर यांनी सांगितले.