Caught a car carrying liquor parcels | दारू पार्सल करणारी कार पकडली

दारू पार्सल करणारी कार पकडली

वसमत : तालुक्यात दारू पार्सलचा कहर झाला आहे. दुचाकीच्या मदतीने ग्रामीण भागात गावोगावी दारू जात आहे. आता चक्क कारमधून दारुचे खोके जात असताना एल.सी.बी.च्या पथकाने पकडले. दारू व कार असा ५ लाख २३ हजार ४० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपी मात्र फरार आहे.

वसमत तालुक्यातील कुरूंदा पोलीस ठाणे हद्दीतील बारंपूर शिवारात खासगी कार (क्र. एम. एच. ३८ - ५०२७) मधून अवैध विक्रीसाठी दारुचे खोके जात असल्याचे एलसीबीच्या पथकाला समजले. पथकाने त्या कारचा पाठलाग केला असता कार चालकाने कार कच्च्या रस्त्याने नेऊन सोडली व फरार झाला. कारमधून देशी दारुचे खोके किंमत २३ हजार ४० रुपये व कार असा पाच लाख २३ हजार ४० रुपयांचा ऐवज जप्त केला. या कारवाईत एलसीबी पथकाचे भगवान आडे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे यांनी सहभाग नोंदविला. यापूर्वीही कुरूंदा पोलिसांनीही दारुचा मोठा साठा जप्त करण्याची कारवाई केली. उत्पादन शुल्क विभागाचे परवानाप्राप्त दारु विक्री केंद्रावर नियंत्रण राहीले नसल्याने परवानाधारकच अवैध दारू व्यवसायाला हातभार लावत असल्याचे चित्र आहे. कारचालकासह आरोपी फरार झाले असून त्याचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Caught a car carrying liquor parcels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.