शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

नाेटबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST

हिंगोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये नोटबंदी जाहीर केली. तसेच दीड वर्षापासून कोरोनामुळे संचारबंदीचे आदेश आहेत. या ...

हिंगोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये नोटबंदी जाहीर केली. तसेच दीड वर्षापासून कोरोनामुळे संचारबंदीचे आदेश आहेत. या दोन्ही काळात लाचखोरीवर कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही. या काळात लाचखोरी जोरात असल्याचे चित्र आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १ हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी चलनात नवीन ५०० व २ हजारांच्या नोटा आणण्यात आल्या. नवीन नोटा चलनात येण्याचा वेग बघता या काळात लाचखोरीवर नियंत्रण मिळेल असे वाटत होते. मात्र या काळात लाचखोरांवर कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही. उलट २०१६ मध्ये २१ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले. त्यानंतरही २०१७ मध्येही १६ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली. कोरोना संकटाच्या काळात तरी लाचखोरीला लगाम बसेल, असे वाटत होते. मात्र याही काळात लाचखोरांनी लाच घेणे सोडले नाही. २०२० मध्ये ११ तर २०२१ मध्ये ३ जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

अधिकाऱ्याची प्रतिक्रिया...

कोणताही शासकीय कर्मचारी, अधिकारी अथवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्ती त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तर नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक ०२४५६-२२३०५५ किंवा ९८२२२००९५९ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.

- नीलेश सुरडकर, उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, हिंगोली

ग्रामविकास सर्वात पुढे

हिंगोली जिल्ह्यात २०१६ पासून २०२१ पर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने लाचखोरांवर कारवाया केल्या. यात २०१६ मध्ये सर्वात जास्त १० जण महसूल विभागात लाचखोरीत सापडले. त्यानंतर २०१७ मध्ये ग्रामविकास विभागात ६, २०१८ मध्ये ७ जण गृह विभागातील लाचखोर सापडले. २०१९ मध्ये कृषी विभागात ३ तर २०२० मध्ये ग्रामविकास विभागातील ५ लाचखोर जाळ्यात अडकले.

२०२१ मध्ये लाच ५ हजारांपासून ३ लाखांपर्यंत...

वाळूचे टिप्पर सोडण्यासाठी ३ लाखांची लाच

पोलिसांनी पकडलेले वाळूचे ५ टिप्पर सोडण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी तहसीलदारांनी ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. २०२१ मध्ये एसीबीने केलेल्या कारवाईत केली.

विहिरीचे मस्टर काढण्यासाठी १० हजारांची लाच

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेतून मंजूर झालेल्या सिंचन विहिरीचे मस्टर काढण्यासाठी एका अभियंत्याने लाभार्थीच्या मुलाकडून १० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. २०२१ मध्ये एसीबीने केलेल्या कारवाईत हे स्पष्ट झाले होते.

वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकावर कारवाई

सातव्या वेतन आयोगाच्या वेतन फरकाच्या बिलाची छाननी करून शिक्षणाधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेऊन देतो. तसेच ते बिल औरंगाबाद येथील उपसंचालकांकडे दाखल करण्यासाठी एकाकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या प्रभारी अधीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते.

वर्ष लाच प्रकरणे

२०१६ २१

२०१७ १६

२०१८ २२

२०१९ १३

२०२० ११

२०२१ ०३