हिंगोलीत रेल्वे रुळावर आढळला महाविद्यालयीन युवकाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 17:31 IST2019-02-13T17:30:28+5:302019-02-13T17:31:09+5:30

मृत हिंगोली तालुक्यातील पळसोना गावाचा रहिवासी असल्याचे समजते. 

The body of the college youth found on the railway track in Hingoli | हिंगोलीत रेल्वे रुळावर आढळला महाविद्यालयीन युवकाचा मृतदेह

हिंगोलीत रेल्वे रुळावर आढळला महाविद्यालयीन युवकाचा मृतदेह

हिंगोली :  शहरानजीक खटकाळी परिसरात रेल्वे रुळावर एका महाविद्यालयीन युवकाचा मृतदेह आज सकाळी आढळल्याने खळबळ उडाली आहे. सदरील मृतदेहाची ओळख पटली असून त्या मृत युवकाचे नाव स्वस्तिक संतोष राठोड (१७) असे असून तो हिंगोली तालुक्यातील पळसोना गावाचा रहिवासी असल्याचे समजते. 

ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप कुटुंबियांनी केला असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. स्वास्तिकला मारून रेल्वे रुळावर टाकण्यात आले, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत  आरोपींना अटक होणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

Web Title: The body of the college youth found on the railway track in Hingoli