शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

रक्तपेढी ऑक्सिजनवर; दोन-तीन दिवस पुरेल एवढाच साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:30 IST

हिंगोली : जिल्ह्यात शासकीय रुग्णालय वगळता जिल्ह्यात कुठेही रक्तपेढी नाही. एकाच रक्तपेढीतून रक्ताचा पुरवठा केला जातो. जिल्हा रुग्णालयातील ...

हिंगोली : जिल्ह्यात शासकीय रुग्णालय वगळता जिल्ह्यात कुठेही रक्तपेढी नाही. एकाच रक्तपेढीतून रक्ताचा पुरवठा केला जातो. जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असल्याचे रक्तपेढी संकलकांच्यावतीने सांगण्यात आले.

जिल्ह्याला रक्तपुरवठा करण्यासाठी शासकीय रक्तपेढी एकच आहे. तसेच वसमत येथील महिला रुग्णालयात एक रक्त साठवण कक्ष सद्यस्थितीत कार्यरत आहे. दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत रक्तसंकलन कमीच होते. त्यामुळे बहुतांशवेळा रक्ताचा तुटवडा जाणवत असतो.

गतवर्षी कोरोनाचा संसर्ग असतानासुद्धा जिल्ह्यातील रक्तदान शिबिर आयोजकांनी वेळोवेळी रक्तदान शिबिरे घेऊन कमतरता भासू दिली नाही. सध्या जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये ‘ए’ पॉझिटिव्ह १०, ‘बी’ पॉझिटिव्ह १, ‘ओ’ पॉझिटिव्ह १५ असून, सध्या रक्तपेढीमध्ये एकूण २६ बाटल्या (बॅग) साठा उपलब्ध आहे. हा २६ बाटल्यांचा साठा नजीकच्या दोन-तीन दिवसांपुरताच आहे. पुढे रक्ताची तीव्र कमतरता जाणवणार आहे. रक्तपेढीतील जनसंपर्क अधिकारी बंडू नरवाडे व सामाजिक कार्यकर्ते आत्माराम जटाळे हे रक्तदान आयोजकाला फोन करून रक्तदान शिबिरासाठी प्रवृत्त करीत आहेत.

रक्तपेढीच्यावतीने आवाहन करण्यात येत की, स्वेच्छेेने रक्तपेढीत येऊन रक्तदान करावे किंवा रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदान करावे. जेणेकरून हिंगोली जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही.

प्रतिक्रिया

यावर्षी रक्तदात्यांनी कोरोना लसीकरणापूर्वी व दुसऱ्या लसीकरणाचा डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर स्वेच्छेेने

रक्तदान करून रक्तपेढीस सहकार्य करावे. तसेच जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे.

- दीपमाला पाटील, रक्तपेढी संकलक, हिंगोली