महावितरण कार्यालयाला भाजप आंदोलकांनी ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 15:52 IST2021-02-05T15:44:19+5:302021-02-05T15:52:00+5:30
वाढीव वीजबिल, तसेन बील न भरल्याने अनेकांची वीजजाेडणी ताेडण्यात आल्याने कळमनुरी येथील महावितरण कार्यालयाला भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

महावितरण कार्यालयाला भाजप आंदोलकांनी ठोकले कुलूप
कळमनुरी : वाढीव वीजबिल व वीजजाेडणी ताेडल्याच्या निषेधार्थ भाजपाच्यावतीने ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास महावितरण विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक आंदोलकांनी महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकून वाढीव वीजबिलाच निषेध केला.
काेराेना काळातील वाढीव वीजबिल, तसेन बील न भरल्याने अनेकांची वीजजाेडणी ताेडण्यात आल्याने कळमनुरी येथील महावितरण कार्यालयाला भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी माजी आ. गजानन घुगे, नंदकिशोर मणियार, अण्णासाहेब मेने, पी. आर. देशमुख, विलास भोसकर, महेश गोविंदवार, रुपेश कदम, अशोक संगेंकर, विक्रम शिंदे, आमिष दरक, कानबाराव शिंदे, रवींद्र जाधव, मन्मथ गंगेवार, विठ्ठल भोयर, राजू पतंगे, मारोतराव देशमुख, आमिष दरक, विक्रम शिंदे, प्रतीक साकळे, गजानन कदम, प्रल्हाद देवकते, लक्ष्मण कऱ्हाळे, राजेश जाधव, बबन पंचलिंगे, साजीद पठाण, एहसान सिद्दिकी, अनिस बागवान, पूंजाराव अडसुळे, विकास जाधव यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.