शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

कृषी यांत्रिकीकरणात ७११ शेतकऱ्यांना साडेचार कोटींचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:29 IST

हिंगोली : राज्य शासनाने कृषीच्या विविध योजनांसाठी आता महाडीबीटी पोर्टल सुरू केले असून, यावर अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य स्तरावरून ...

हिंगोली : राज्य शासनाने कृषीच्या विविध योजनांसाठी आता महाडीबीटी पोर्टल सुरू केले असून, यावर अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य स्तरावरून सोडत पद्धतीने कृषी यांत्रिकीकरणसह विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहेत. यांत्रिकीकरणाच्या ७११ लाभार्थ्यांची निवड झाली असून, त्यांना ४.४८ कोटींचा लाभ मिळणार आहे.

कृषी यांत्रिकीकरणाकडे आता शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. अनुदानावर ट्रॅक्टर, ट्रक्टरवर चालणारी अवजारे, सूक्ष्म सिंचनातील साहित्य आदी बाबी मिळतात. त्यामुळे याला मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती असल्याचे दिसत आहे. पॉवर टिलरपासून ते मोठ्या ट्रॅक्टरपर्यंत सर्वच बाबींसाठी अर्ज येत आहेत. पूर्वी शेतात बैल, मजूर, पारंपरिक अवजारे वापरून शेतीकामे केली जायची. मात्र, हळूहळू हे बाळगणे परवडत नसल्याने शेतकरी यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत आहेत. काही जण आपली शेती करून इतरांच्या शेतात भाडे आकारून यंत्राने कामे करून देत आहेत. त्यामुळे यांत्रिकीकरणाच्या योजनेसाठी तब्बल १४ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यातील काहींचे अर्ज दुबार व तिबार होते. मात्र, तरीही दहा हजार जणांनी लाभासाठी अर्ज केल्याचे सांगितले जाते.

या योजनेची राज्यस्तरावरूनच सोडत झाली आहे. यात ७११ जणांना लाभ मिळणार आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील १७१, कळमनुरी १४५, वसमत १४९, औंढा १३७, सेनगाव १०९ असे लाभार्थी निवडण्यात आले आहेत. वेगवेगळ्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आर्थिक तरतुदीनुसार वेगवेगळे लाभ देण्यात आले. त्यात काहींना अनुदान जास्त असून, काहींना कमी आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना आता संदेश देण्यात आलेला आहे. या लाभार्थ्यांनी आता त्यांना मंजूर झालेले यंत्र, अवजार खरेदी करायचे आहे. त्यानंतर, ऑनलाइन कागदपत्रे अपलोड करून प्रस्ताव तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करायचा आहे. त्याची छाननी झाल्यानंतर थेट सदर शेतकऱ्याच्या खात्यात लाभाची रक्कम जमा होणार आहे.

याबाबत कृषी अधीक्षक अधिकारी विजय लोखंडे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ज्या ७११ लाभार्थ्यांना यांत्रिकीकरण योजनेत साहित्य खरेदीची मंजुरी मिळाली. त्यांनी ते साहित्य खरेदी करायचे आहे. त्याची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तो प्रस्ताव सादर करायचा आहे. ऑनलाइन त्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल.