एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST2021-04-02T04:31:02+5:302021-04-02T04:31:02+5:30

जिल्ह्यात मागील काही दिवसापूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील तापमानात घट झाल्याचे पहावयास मिळाले. मात्र त्यानंतर सूर्य ...

April will increase district fever | एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप

एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप

जिल्ह्यात मागील काही दिवसापूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील तापमानात घट झाल्याचे पहावयास मिळाले. मात्र त्यानंतर सूर्य आग ओकत असून दिवसभर उकाडा जाणवत आहे. शेतातील कामेही सकाळच्या वेळीच उरकली जात आहेत. तर दुपारच्या वेळी प्रत्येकजण सावलीचा आधार घेत असल्याचे चित्र आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उकाडा वाढत असून तापमान ४० अंशावर गेले आहे. आणखी काही दिवसांत यामध्ये वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातील कुलर दुरूस्तीला बाहेर काढले आहे. मात्र, विजेचा लपंडावामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

मंगळवारचे रेकॉर्ड

-मागील आठवड्यात जिल्ह्यातील तापमानात वाढ होत असल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात २४ मार्च रोजी कमाल तापमान ३४ अंश होते. त्यात दुसऱ्या दिवशी एका अंशाने वाढ होत तापमान ३६ अंशावर पोहचले. -त्यानंतरच्या प्रत्येक दिवशी एका अंशाने वाढ होत तापमान ३० मार्च रोजी ४० अंशावर पोहचले होते. तसेच १ एप्रिल रोजी तापमान ४० अंश होते.

असा राहिल आठवडा

जिल्ह्यातील तापमान ४० अंशावर पोहचले असले तरी एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकणार असल्याचे सांगितले जात आहे. स्कायमॅट या संकेतस्थळावर २ एप्रिल रोजी कमाल तापमान ३८, ३, ४ व ५ एप्रिल रोजी ३९ अंश तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. -

त्यानंतर ६ व ७ एप्रिल रोजी तापमानात पुन्हा एका अंशाने वाढ होत तापमान ४० अंशावर राहिल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

फोटो : १३

Web Title: April will increase district fever