शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST

हे सुरू राहणार.. रुग्णालय, रोगनिदान केंद्र, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालय, औषधी दुकाने, औषधी निर्मिती उद्योग, इतर वैद्यकीय आणि आरोग्य ...

हे सुरू राहणार..

रुग्णालय, रोगनिदान केंद्र, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालय, औषधी दुकाने, औषधी निर्मिती उद्योग, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, दूध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जसे की, रेल्वे, टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि सार्वजनिक बसेस, स्थानिक प्राधिकरणाकडून देण्यात येणाऱ्या सार्वजनिक सेवा, वस्तूंची वाहतूक, कृषी संबंधित सेवा, ई कॉमर्स, अधिकृत मीडिया, पेट्राेल पंप, पेट्राेलियम पदार्थ, डाक, शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा, फळ विक्रेते

अत्यावश्यक सेवा असलेल्या दुकानांनी सामाजिक अंतर ठेवून, दुकानांसमोर अंतरासाठीच्या खुणा, ठरावीक अंतराने कोराेना चाचणी करून सकारात्मक अहवाल सोबत ठेवणे बंधनकारक आहे.

उत्पादन क्षेत्रही विविध अटींचे पालन केल्यास सुरू ठेवता येणार आहे. त्यासाठीच्या वेगळ्या अटी निर्गमित केल्या आहेत. बांधकामासाठीही अटीच्या अधिन राहून परवानगी दिली.

हॉटेल व रेस्टॉरंट

लॉजिंगच्या आतील आवारात असलेले रेस्टॉरंट आणि बार चालू राहतील व उर्वरित सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद राहतील. फक्त पार्सल सेवा घरपोच देता येईल. लॉजमधील सोडून इतरांना तेथेच जेवणाची सेवा देता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी लागणाऱ्या गाड्यांनाही पार्सल सेवाच देता येणार आहे.

काय बंद राहणार

अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल्स बंद राहतील. सिनेमा हॉल, नाट्यगृहे, प्रेक्षागृहे, सर्व धार्मिक स्थळे, केश कर्तनालय, स्पा, सलून, व्यायामशाळा, मनोरंजन पार्क, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, ब्युटी पार्लर, शाळा आणि महाविद्यालेय बंद राहतील. मात्र दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना यात सुट राहील. त्यांनी चाचणी निगेटिव्ह आल्याचा अहवाल सोबत ठेवणे आवश्यक राहील. धार्मिक उत्सव, यात्रा, राजकीय सभा, बैठका यांनाही बंदी आहे. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनाही परवानगी नाही.

लग्नसमारंभ ५० जणांत आटोपावा लागणार असून त्यासाठी परवानगी आवश्यक आहे. अंत्यविधीही २० जणांच्या उपस्थितीत उरकावा लागेल.

खाजगी वाहतुकीला नियमांचे बंधन

सार्वजनिक बस व्यवस्थेला आसन क्षमतेनुसार परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाजगी वाहने व बससेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरु राहतील. तर अत्यावश्यक सेवेच्या उर्वरित कालावधीतही सुरू राहतील.यात बसण्याच्या क्षमतेएवढेच प्रवासी नेता येतील. उभे राहून जाता येणार नाही. ऑटो रिक्षात चालक व इतर दोन प्रवासी तर टॅक्सीमध्येचलक व आसनक्षमतेच्या ५० टक्केच प्रवासी नेता येणार आहेत.

बंद दुकानदारांनी हे करावे

सध्या बंद असलेल्या सर्व दुकान मालकांना त्यांच्याबरोबर काम करणऱ्या सर्व लोकांना केंद्र शासनाच्या निकषनुसार लसीकरण करण्यास तसेच पारदर्शक काच किंवा इतर साहित्याच्या, ग्राहकांशी सुसंवाद करण्यासाठी तसेच इलेक्ट्राॅनिक पेमेंट इत्यादी उपाययोजना करावी. जेणेकरून सरकार कोणतीही भीती न बाळगता हे पुन्हा सुरू करण्यास पसंती दर्शविल.