महसूल विभागात खळबळ! वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी अवैध खनन प्रकरणी निलंबीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:08 IST2026-04-10T12:05:38+5:302026-04-10T12:08:21+5:30

वसमत तहसीलदारांचे मुख्यालय आता जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्यालय सोडण्यास मज्जाव.

Action Against Basmat Tehsildar: Sharda Dalvi Suspended by Revenue Dept for Dereliction of Duty. | महसूल विभागात खळबळ! वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी अवैध खनन प्रकरणी निलंबीत

महसूल विभागात खळबळ! वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी अवैध खनन प्रकरणी निलंबीत

वसमत (जि. हिंगोली) : अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीविरुद्धच्या कर्तव्यात निष्काळजीपणा वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांना चांगलाच भोवला असून, ९ एप्रिल रोजी महसूल व वन विभागाचे अवर सचिव प्रविण पाटील यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले.

तहसीलदार शारदा दळवी त्यांच्याविरुद्ध अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीसंदर्भात प्रशासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यासंदर्भात सर्वसामान्यांतून अनेकवेळा नाराजीही पुढे आली होती. अतिमहत्त्वाच्या शासकीय कामात त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आणि निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका महसूल व वन विभागाने ठेवला आहे. हा प्रकार महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन ठरणारा असल्याने, त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली.निलंबन कालावधीत शारदा दळवी यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय येथे निश्चित करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वसंमतीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच निलंबन काळात त्यांना कोणताही खाजगी व्यापार, व्यवसाय किंवा नोकरी करता येणार नाही, असेही आदेशान नमूद केले आहे. 

महसूल विभागात खळबळ
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार निर्गमित करण्यात आलेल्या या निर्णयामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. आता अवैध वाळू उपसा आणि गौण खनिज माफियांच्या विरोधात कडक पावले न उचलणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हा एक इशारा मानला जात आहे. मागील काही महिन्यांपासून तालुक्यात वाढलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीच्या विरोधात ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठविला होता, हे विशेष.

Web Title : वसमत तहसीलदार अवैध खनन मामले में लापरवाही के लिए निलंबित

Web Summary : वसमत तहसीलदार शारदा दलवी को अवैध खनन रोकने में लापरवाही के चलते निलंबित किया गया। अनाधिकृत खनिज निष्कर्षण के संबंध में कई शिकायतें दर्ज की गईं। राज्यपाल के आदेश के बाद कार्रवाई, राजस्व विभाग में हड़कंप।

Web Title : Wasmat Tehsildar Suspended for Negligence in Illegal Mining Case

Web Summary : Wasmat Tehsildar Sharda Dalvi suspended due to negligence in preventing illegal mining. Numerous complaints were filed regarding unauthorized mineral extraction. Action taken following Governor's order, sending shockwaves through the revenue department.