शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

ड्रायडेच्या दिवशी दारुविक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:55 AM

लोकसभा निवडणुक कालावधीत बेकायदेशीररीत्या दारूविक्री करणाऱ्यांविरूद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ एप्रिल रोजी धडक कारवाई केली.

हिंगोली : लोकसभा निवडणुक कालावधीत बेकायदेशीररीत्या दारूविक्री करणाऱ्यांविरूद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ एप्रिल रोजी धडक कारवाई केली.हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून १५ हजार ३६० रूपये किंमतीचा अवैध देशी दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी परवानाधारक देशी दारूविक्री करणाºयांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मालाबाई सीताराम जैस्वाल, अमित सीताराम जैस्वाल दोघे रा. सेनगाव यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थागुशाचे पोनि जगदीश भंडरवार व त्यांच्या पथकातील पोउपनि लंबे, पोहेकॉ बोके, जाधव, राठोड, संभाजी लेकुळे, पंचलिंगे, कुडमेते व सोळंके आदींनी केली. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानूसार हिंगोली लोकसभा मतदार संघामध्ये १८ एप्रिल रोजी निवडणुक होणार आहे. सदर निवडणुक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळेपूर्वीच्या म्हणजेच ४८ तासांमध्ये मद्यविक्री करण्यास मनाई, कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. परंतु जिल्ह्यात काही ठिकाणी कायद्याचे उल्लंघन करून मद्यविक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. पोलिस प्रशासनाकडून बेकायदेशीररीत्या कायद्याचे उल्लंघन करून दारूविक्री करणाºयांविरूद्ध धडक कारवाई करून आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल केले जात आहेत.

टॅग्स :Nandedनांदेडalcohol prohibition actदारुबंदी कायदाHingoli policeहिंगोली पोलीसCrime Newsगुन्हेगारी