मोफत प्रवेशाच्या ५३० जागांसाठी ९५६ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:29 IST2021-03-31T04:29:45+5:302021-03-31T04:29:45+5:30

हिंगोली : दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेतही मोफत प्रवेश मिळावा, यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ...

956 applications for 530 free admission seats | मोफत प्रवेशाच्या ५३० जागांसाठी ९५६ अर्ज

मोफत प्रवेशाच्या ५३० जागांसाठी ९५६ अर्ज

हिंगोली : दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेतही मोफत प्रवेश मिळावा, यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यानुसार ३० मार्चपर्यंत ५३० जागांसाठी ९५६ अर्ज आले आहेत.

दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना खासगी शाळेत मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेत अशा शाळांत २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील ७९ शाळांनी मोफत प्रवेश देण्यासाठी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या ७९ शाळांतील ५३० जागांसाठी ३ मार्चपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. ३० मार्चपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. मोफत प्रवेशासाठी पालकांनी अर्ज सादर करण्यात सुरुवात केली होती. मात्र, १ ते ७ मार्चपर्यंत जिल्हाभरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे अर्ज भरण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर मुदतवाढ मिळाल्यानंतर पालकांनी अर्ज सादर करण्यास सुरुवात केली होती. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० मार्च रोजी संपली असून, सायंकाळपर्यंत ९५६ अर्ज दाखल झाले आहेत.

प्रवेश फेरी सुरू होण्याची पालकांना प्रतीक्षा

जिल्ह्यातील मोफत प्रवेशासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली असली तरी आता पुन्हा मुदत वाढ मिळण्याची शक्यता कमीच आहे. मोफत प्रवेशाच्या जागांच्या दुप्पट अर्ज आल्याने आता मोफत प्रवेशाची फेरी कधी सुरू होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: 956 applications for 530 free admission seats