महसूलची करवसुली ८५ टक्क्यांच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST2021-03-19T04:28:31+5:302021-03-19T04:28:31+5:30

हिंगोली जिल्ह्याला जमीन महसुलाचे७.६१ काेटींचे उद्दिष्ट होते. यापैकी ५.८० कोटी वसूल झाले. यात हिंगोलीत २.५० पैकी १.६५ कोटी, सेनगावात ...

85% of revenue tax collection | महसूलची करवसुली ८५ टक्क्यांच्या घरात

महसूलची करवसुली ८५ टक्क्यांच्या घरात

हिंगोली जिल्ह्याला जमीन महसुलाचे७.६१ काेटींचे उद्दिष्ट होते. यापैकी ५.८० कोटी वसूल झाले. यात हिंगोलीत २.५० पैकी १.६५ कोटी, सेनगावात ७० लाखांपैकी २४.९० लाख, कळमनुरीत १.५० कोटींपैकी ८०.५२ लाख, वसमतला २.११ कोटींपैकी १.१३ कोटी, औंढ्यात ८० लाखांपैकी ४५.४३ लाखांची वसुली झाली आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांमध्ये जमीन महसुलाच्या वसुलीला फटका बसला असल्याचे दिसून येत आहे.

गौण खनिज वसुलीत ८६ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. यातही हिंगोली तालुका वगळता इतर कोणत्याच तालुक्यात १०० टक्के उद्दिष्ट गाठता आले नाही. हिंगोलीत ७.५० कोटींचे उद्दिष्ट असताना ७.७३ कोटींचा महसूल जमा केला. सेनगावात ६ कोटींपैकी ४.२९ कोटींचा महसूल मिळाला. कळमनुरीत ७ कोटींपैकी ३.१० कोटीच जमा झाले. वसमतला ७.५० कोटींपैकी ६ कोटी, औंढ्यात ६.५० कोटींपैकी २.७६ कोटींच्या महसुलाचे उद्दिष्ट गाठता आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने ४.२५ कोटींचा महसूल जमविला. तर इतर पाच कोटींच्या महसुलाची गंगाजळी जमा झाली आहे. त्यामुळे यातून २९.८५ कोटींचे उद्दिष्ट गाठता आले आहे. दोन्ही मिळून ३५.६५ कोटी जमा झाले आहेत. तर ४२.११ कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आणखी ७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. आगामी दहा दिवसांत हे उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान महसूलसमोर आहे.

Web Title: 85% of revenue tax collection