जिल्ह्यात ८०३ जणांनी केले लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:27 IST2021-03-07T04:27:14+5:302021-03-07T04:27:14+5:30

हिंगोली : जिल्ह्यातील २९ शासकीय व ३ खासगी दवाखान्यात ६ मार्च रोजी ८०३ जणांनी लसीकरण केले. यामध्ये ४३५ ज्येष्ठांचा ...

803 people were vaccinated in the district | जिल्ह्यात ८०३ जणांनी केले लसीकरण

जिल्ह्यात ८०३ जणांनी केले लसीकरण

हिंगोली : जिल्ह्यातील २९ शासकीय व ३ खासगी दवाखान्यात ६ मार्च रोजी ८०३ जणांनी लसीकरण केले. यामध्ये ४३५ ज्येष्ठांचा समावेश होता.

६ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात आरोग्य कर्मचारी १०, इतर विभागातील कर्मचारी १४१, दुसरा डोस घेणारे ९८, ४५ ते ६० वर्षांखालील इतर आजार असणाऱ्यांची संख्या २२, साठ वर्षांवरील लसीकरणाची संख्या ७०, प्राथमिक आरोग्य केंद्र भांडेगाव येथे आरोग्य कर्मचारी १, इतर विभागातील कर्मचारी ५, दुसरा डोस घेणारे ६, साठ वर्षांखालील ५, साठ वर्षांवरील ६०, प्रा. आ. केंद्र वाकोडी येथे आरोग्य कर्मचारी ७, साठ वर्षांखालील ४, ग्रामीण रुग्णालय औंढा येथे आरोग्य कर्मचारी २, इतर विभागातील कर्मचारी १८,दुसरा डोस घेणारे ६, ६० वर्षांखालील १३, साठ वर्षांवरील ५७, प्रा. आ. केंद्र गोरेगाव येथे दुसरा डोस १५, साठ वर्षांखालील ३, साठ वर्षांवरील ८४, प्रा. आ. केंद्र कवठा येथे आरोग्य कर्मचारी २, इतर विभागातील कर्मचारी २,साठ वर्षांवरील ५८, प्रा. आ. केंद्र कापडसिंगी आरोग्य कर्मचारी १, दुसरा डोस घेणारे ४, साठ वर्षांखालील १, साठ वर्षांवरील २३, स्नेहल नर्सिंग होम येथे आरोग्य कर्मचारी ३६, इतर विभागातील १, साठ वर्षांखालील ३२, साठ वर्षांवरील ३१, माधवबाग हॉस्पिटल येथे साठ वर्षांखालील ५२, साठ वर्षांवरील २२,नाकाडे हॉस्पिटल येथे साठ वर्षांखालील १३, साठ वर्षांवरील २७ जणांनी लसीकरण केले.

Web Title: 803 people were vaccinated in the district