शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

रोहयोच्या कामांवर ८ हजार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 1:00 AM

मग्रारोहयोच्या कामांवर मजूर उपस्थिती वाढत असून दररोज ८ हजारांवर मजूर उपस्थित राहात आहेत. साप्ताहिक मजूर उपस्थितीचा आकडा ४९ हजारांच्या घरात गेला आहे. दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे मजूर या कामांवर येताना दिसत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मग्रारोहयोच्या कामांवर मजूर उपस्थिती वाढत असून दररोज ८ हजारांवर मजूर उपस्थित राहात आहेत. साप्ताहिक मजूर उपस्थितीचा आकडा ४९ हजारांच्या घरात गेला आहे. दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे मजूर या कामांवर येताना दिसत आहेत.हिंगोली जिल्ह्यात यंदा अल्पपर्जन्यामुळे रबीचा हंगाम नसल्यातच जमा आहे. काही भाग वगळता बहुतांश भागात रबीची पिके दिसण्याइतकीही नाहीत. त्यामुळे अशा भागांमध्ये रोहयोच्या कामांशिवाय कोणताच पर्याय शिल्लक नाही. त्यामुळे रोहयोच्या कामांवर मजूर येताना दिसत आहेत. औंढा वगळता इतर सर्वच तालुक्यांमध्ये हजारो मजूर रोहयोच्या कामांवर येत असल्याचे चित्र आहे. यामध्ये ग्रामपंचायतींची एकूण ७0६ तर यंत्रणांची २७३ कामे सुरू आहेत. ग्रामपंचायतींच्या कामांवर ४३ हजार २५२ तर यंत्रणांच्या कामांवर ६३१२ मजुरांची साप्ताहिक उपस्थिती आहे.यंत्रणा व ग्रामपंचायतींची मिळून सुरू असलेली कामे व साप्ताहिक मजूर उपस्थिती पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये हिंगोली १५५ कामांवर ८ हजार ४२८ मजूर, कळमनुरीत १५८ कामांवर ९ हजार ११४ मजूर, सेनगावात ३0९ कामांवर २0 हजार ४२४ मजूर, वसमत तालुक्यात २७४ कामांवर ९ हजार ६४६ मजूर, औंढा तालुक्यात ८३ कामांवर १९५२ मजूर आहेत.मागील काही दिवसांत मजुरांचे प्रमाण वाढू लागल्याने ग्रामपंचायती ही कामे सुरू करण्यास पुढाकार घेताना दिसत आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये मात्र अजूनही कामे सुरू करण्यास टाळाटाळ कायम असल्याचे चित्रही पहायला मिळते.दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने शेल्फवर तब्बल ५४८८ कामे ठेवली आहेत. यामध्ये हिंगोलीत १0८४, कळनुरीत १३३१, सेनगावात १९४१, वसमतला ५६८, औंढा नागनाथला ५६४ कामे आहेत. या कामांवर ११ लाख मजुरांना काम उपलब्ध करून देणे शक्य आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये एवढी कामे पुरेशी असून गरज पडल्यास आणखी वाढविणे शक्य आहे. त्यामुळे ज्या भागात मजुरांच्या हाताला काम नाही, अशांनी ग्रामपंचायतींकडे कामाची मागणी केल्यास तात्काळ काम उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांनी सांगितले.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीgovernment schemeसरकारी योजना