शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

चोरीला गेलेल्या २९ दुचाकी जप्त; एकाला घेतले ताब्यात, दोघे फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 7:46 PM

दुचाकी चोरट्यांनी चेसिस व इंजिन नंबरमध्ये खाडाखोड करून हिंगोली, नांदेड, औरंगाबादमध्ये प्रत्येकी २, वाशिममध्ये ३, परभणी, अकोला, बुलढाणा येथे प्रत्येकी १ आणि अन्य जिल्ह्यातून अशा एकूण २९ दुचाकी चोरल्या आहेत.

हिंगोली : दुचाकी चोरून चेसिस क्रमांक व इंजिन क्रमांकावर खाडाखोड करून बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करणाऱ्या दुचाकी चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून पोलिसांनी २९ दुचाकी जप्त केल्या. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून १० एप्रिल रोजी दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला यातील आरोपी जिंतूर तालुक्यातील गडदगव्हाण येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने सचिन ऊर्फ राजू रामा खिल्लारे (रा. गडदगव्हाण) याला ताब्यात घेतले. यावेळी सचिन खिल्लारे याने पांगरी येथील हरीदास व्यंकटीराम टापरे, अरविंद हरीदास टापरे या दोघांच्या मदतीने दुचाकी चोरून चेसिस नंबर व इंजिन नंबरची खाडाखोड करून बनावट कागदपत्रांच्या आधारे दुचाकी विक्री केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपीकडून १५ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या २९ दुचाकी जप्त केल्या. यातील हरीदास टापरे दुचाकी चोरी करण्यात सराईत असून त्याच्यावर यापूर्वीही दुचाकी चोरीप्रकरणी गुन्हा नोंद आहे. पोलिसांनी सचिन ऊर्फ राजू रामा खिल्लारे याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्याकडून आणखी दुचाकी मिळण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, हिंगोली ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. आर. बंदखडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के. डी. पोटे, एस.एस. घेवारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी बोके, शंकर जाधव, विलास सोनवणे, अशोक धामणे, सुनील अंभोरे, विठ्ठल कोळेकर, संभाजी लेकुळे, भगवान आडे, शंकर ठोंबरे, राजू ठाकूर, किशोर कातकडे, विशाल घोळवे, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत, आकाश टापरे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघण, सुमित टाले, चालक शेख जावेद यांच्या पथकाने केली.

दुचाकी चोरटे निघाले मामा-भाचेदुचाकी चोरट्यांनी चेसिस व इंजिन नंबरमध्ये खाडाखोड करून हिंगोली, नांदेड, औरंगाबादमध्ये प्रत्येकी २, वाशिममध्ये ३, परभणी, अकोला, बुलढाणा येथे प्रत्येकी १ आणि अन्य जिल्ह्यातून अशा एकूण २९ दुचाकी चोरल्या आहेत. तसेच याआधी गडदगव्हान, दाभा, जोडपरळी, टेभुर्णी, डिग्रस येथे दुचाकी विक्री केल्या आहेत. विशेष म्हणजे दुचाकी चोरटा हरीदास व्यंकटीराम टापरे हा आरोपी सचिन ऊर्फ राजू रामा खिल्लारे याचा मामा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली