शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

राज्यातील २१ हजार वीजग्राहकांनी घेतला ई-बीलाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 4:08 PM

ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

हिंगोली : वीजबील भरण्यासाठी छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना प्रती वीजबील १० रुपये सवलत महावितरणने १ डिसेंबर २०१८ ला जाहीर केली होती.  मागील एका महिन्यात राज्यातील २१ हजार ग्राहकांनी तर नांदेड परिमंडळातील ९९५ वीजग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. अन्य ग्राहकांनीही या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

पर्यावरणपूरक कागदविरहीत वीजबीलासाठी आता घरगुती, व्यावसायिक अशा लघूदाब वीजग्राहकांनीही गो-ग्रीनच्या माध्यमातून सवलीचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे. नांदेड परिमंडळातील नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयातील वीजग्राहकांनी कागदविरहीत वीजबिलांसाठी केलेली नोंदणी अत्यल्प आहे. नांदेड जिल्हयात ५५९ परभणीमध्ये २६५ तर हिंगोली जिल्हयामध्ये केवळ १७१ वीजग्राहकांनी नोंदणी केली आहे. वीजबील आॅनलाईन पाहण्यासाठी महावितरणने ग्राहकांना मोबाईल अ‍ॅप व http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबीलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतू जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध करून दिले जाते. अशा सर्व ग्राहकांना १ डिसेंबर  २०१८ पासून प्रतीबील १० रुपये सवलत दिली जात आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे अथवा महावितरणच्या संकेतस्थळावर करावी. गो-ग्रीनचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून संदभार्साठी वीजबिलाचे जतन करणेही सोपे ठरणार आहे. गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावणारा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागद विरहीत गो-ग्रीन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनelectricityवीजbillबिलmahavitaranमहावितरण