शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

२० टक्के, ४० टक्के शाळांतील शिक्षकांना आनंद मात्र सरसकट अनुदानाची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST

हिंगोली : विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने राज्य शासन अनुदान देत असून, मागील दहा ते पंधरा वर्षांपासूनचा हा लढा अजूनही संपलेला ...

हिंगोली : विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने राज्य शासन अनुदान देत असून, मागील दहा ते पंधरा वर्षांपासूनचा हा लढा अजूनही संपलेला नसल्याचे शिक्षक सांगत आहेत. जे मिळाले त्याचे आम्ही हक्कदार आहोत, उर्वरित कधी मिळणार? असा प्रश्न विचारला जात आहे. हिंगोली जिल्ह्यात ३ शाळा विनाअनुदानितवरून २० टक्क्यांवर आल्या आहेत तर २० शाळांना आता ४० टक्के अनुदान मिळणार? आहे. याशिवाय ४१ कनिष्ठ महाविद्यालयांनाही आता ४० टक्के अनुदान मिळणार? आहे. मार्च एंडपूर्वीच या सर्व शाळा, महाविद्यालयांच्या शिक्षकांची देयके सादर करण्यास सांगितले होते. ज्यांनी ही देयके सादर केली, त्या सर्वांना याचा लाभही मिळणार? आहे. शासनाने यासाठी अनुदानही उपलब्ध करून दिले आहे. अनेक शिक्षकांना मागील चार महिन्यांपासूनची फरकाची रक्कमही यात मिळणार? आहे. त्यामुळे शिक्षकांना आनंद झाला आहे. मात्र, अनेक शिक्षकांनी हा आमचा हक्क आहे. तत्कालिन सरकारने पहिला टप्पा तर दिला, मात्र पुन्हा दुर्लक्ष झाले. या सरकारने आता हा टप्पा दिला. त्यामुळे सरकारचे आभारही मानले. यामुळे शिक्षकांना आर्थिक स्थैर्य लाभल्यास त्याचा गुणवत्तावाढीसाठीही नक्कीच फायदा होईल, असेही सांगण्यात आले.

शासनाने अनुदान ४० टक्के केल्याच्या निर्णयाने आनंद झाला. यामुळे शिक्षकांना न्याय मिळाला. आता ते गुणवत्तावाढीकडे लक्ष देऊ शकतील. उर्वरितला असा विलंब होऊ नये, ही अपेक्षा आहे.

- गौतम भिसे, संस्थाचालक

यंदा अनुदानाचा एक टप्पा मिळाल्याने खुश आहोत. परंतु, प्रचलितनुसार सरसकट दिले असते तर शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांच्या हालअपेष्टा थांबल्या असत्या. इतर क्षेत्रांना जसा निधी मिळतो, तसा शिक्षण क्षेत्राला मिळत नाही, याची खंत आहे.

- पंजाब गव्हाणकर, संस्थाचालक

हिंगोली जिल्ह्यातील ज्या शाळा अनुदानासाठी पात्र ठरल्या, त्यापैकी ज्यांनी प्रस्ताव सादर केले, त्या सर्वांची देयके सादर झाली. ती मंजूरही झाली आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या जिल्ह्याच्या पालकमंत्री असल्याने त्यांनी या जिल्ह्याकडे विशेष लक्ष वेधले होते. आता गुणवत्तावाढीचीही या शिक्षकांकडून अपेक्षा आहे.

- पी. बी. पावसे, शिक्षणाधिकारी

मी २०१०पासून कार्यरत आहे. आता अनुदान आले. मात्र, प्रचलितनुसार आतापर्यंत १०० टक्के अनुदान मिळणे अपेक्षित होते. त्याचे आम्ही हक्कदार आहोत. प्रत्येकवेळी आंदोलन करून आम्हाला हक्क मिळवावा लागत आहे. या निर्णयामुळे आम्ही आनंदित आहोत. मात्र, पुढील टप्पेही आता वेळेत मिळाले पाहिजेत.

- अरविंद सावळे, शिक्षक

मागील १५ वर्षांपासून मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आता २० टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर अनुदान आले. त्याचा मनापासून आनंद झाला. मात्र, हे टप्पे एवढ्या विलंबाने दिले जात असल्याच्या वेदना होत आहेत. यापुढे हे हाल होऊ नयेत, यासाठी शासनाला विनंती आहे.

- एम. एस. शेख, शिक्षक

अनेक वर्षांपासून अनुदानाची प्रतीक्षा सुरू आहे. शासनाने पुढचा टप्पा दिल्याचा आनंद आहे. मात्र, त्याला मोठा विलंब झाला आहे. पुढच्या टप्प्याला असा विलंब होऊ नये, अशी अपेक्षा आहे.

- संतोष पतंगे, कर्मचारी