शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

बुडित मजुरीसाठी १ कोटी २३ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:22 AM

गरोदर व बाळंत मातांना मानव विकासकडून बुडीत मजूरी दिली जाते. प्रत्येकी चार हजार रूपये याप्रमाणे लाभार्थी मातेच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येते. जिल्ह्यातील ३ हजार ८९ महिलांना बुडित मजुरी दिली जाणार असून त्यासाठी लागणारा १ कोटी २३ लाख ५६ हजारांच्या निधीस मानव विकासकडून मंजुरी देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गरोदर व बाळंत मातांना मानव विकासकडून बुडीत मजूरी दिली जाते. प्रत्येकी चार हजार रूपये याप्रमाणे लाभार्थी मातेच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येते. जिल्ह्यातील ३ हजार ८९ महिलांना बुडित मजुरी दिली जाणार असून त्यासाठी लागणारा १ कोटी २३ लाख ५६ हजारांच्या निधीस मानव विकासकडून मंजुरी देण्यात आली आहे.मानव निर्देशाक उंचविण्यासाठी जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये मानव विकास कार्यक्रम राबविला जातो. अनुसूचित जाती, अनु. जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील गरोदर व बाळंत महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. गरोदरपणात आणि प्रसुतीनंतरचा कालावधीत मानव विकासकडून मातांची मजुरी बुडते. सदर महिला आर्थिक लाभासाठी मजुरी करण्यासाठी किंवा कामावर जाऊ नये याची काळजी घेत बुडित मजुरी दिली जाते. प्रथम दोन हजार आणि प्रसुतीनंतर दोन हजार रुपये एकूण चार हजार रूपये अशी लाभाची रक्कम देऊन महिलांना अर्थसहाय्य करण्यात येते. जिल्ह्यातील औंढा नागनाथ, सेनगाव व हिंगोली या तीन तालुक्यांचा मानव विकासमध्ये समावेश आहे. अपेक्षित लाभार्थी महिलांची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील १०७२ लाभार्थी महिलांचा समावेश आहे. तर सेनगाव तालुक्यातील १०९३ आहे. तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील ९२४ याप्रमाणे एकूण ३०८९ महिलांना बुडित मजुरी देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.सदर निधीस मानव विकासकडून मंजुरी मिळाली असली तरी, अद्याप याबाबत आरोग्य विभागातर्फे निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे नियोजन करण्यात आले नाही. तालुका स्तरावरून याद्याही अप्रपाप्त आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम कधी वर्ग होईल हे सांगणे कठीण आहे. आरोग्य खात्याच्या संबंधित विभागाकडून नियोजनाची प्रक्रिया सुरू असली तरी ही कामे संथपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले. लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर विनाविलंब लाभाची रक्कम जमा करणे गरजेचे आहे. शिवाय ही कामे जलदगतिने करण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. जेणेकरून लाभार्थ्यांना शासनाकडून दिली जाणारी बुडित मजुरीची रक्कम वेळेत मिळण्यास मदत होईल.मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य विभागाकडे गरोदर मातांना बुडित मजुरी म्हणून अर्थसहाय्य करण्यासाठी १ कोटी २३ लाख ५६ हजार रूपये निधीस मंजुरी मिळाली आहे. तसेच गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी व ० ते ६ वयोगटातील बालकांची तपासणी तसेच औषधोपचार व शिबीरे यासाठी ४६ लाख ८ हजार रूपये निधीस मंजूरी देण्यात आली आहे. दोन्ही निधी आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मानव विकास अभियानकडून देण्यात आली. त्यामुळे आरोग्य खात्याने लाभार्थी महिलांना बुडित मजुरीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर वेळेत वर्ग करणे गरजेचे आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य