तुमची नखं सांगतील तु्मच्या आरोग्याबद्दल, वेळीच ओळखा संकेत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 17:20 IST2021-07-04T17:19:37+5:302021-07-04T17:20:19+5:30
तुम्हाला माहित आहे का? आपले आरोग्य कसे आहे हे आपल्या नखांवरून आपल्याला समजते. आपल्या नखांवर येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा आपल्या अनेक गोष्टी सांगत असतात. चला तर मग नखांवर येणाऱ्या या रेषा काय सांगता जाणून घेऊ.

तुमची नखं सांगतील तु्मच्या आरोग्याबद्दल, वेळीच ओळखा संकेत...
नखं सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो. मॅनिक्युअर, पॅडीक्युअर. मोठी नखे आपल्या हातांच्या सौंदर्यात भर घालतात. एक काळ असा होता की नखांना केवळ गोल आकार दिला जात होता परंतु आता नखांना वेग वेगळ्या प्रकारे आकार दिला जातो. मात्र तुम्हाला माहित आहे का? आपले आरोग्य कसे आहे हे आपल्या नखांवरून आपल्याला समजते. आपल्या नखांवर येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा आपल्या अनेक गोष्टी सांगत असतात. चला तर मग नखांवर येणाऱ्या या रेषा काय सांगता जाणून घेऊ.
नखे वारंवार तुटणे -जर आपली नखे वारंवार तुटतात किंवा लहान होतात तर त्याचा अर्थ आहे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे. तसेच हे थॉयराइड असण्याचे संकेत देखील देतात.
उभ्या लांब रेषा-उभ्या लांब रेषा वाढते वय आणि त्यानुसार येणाऱ्या समस्या दर्शवतात. या २० ते २५ टक्के लोकांमध्ये दिसतात.
आडव्या रेषा-जर आपल्या नखांवर अशा रेषा दिसत असतील तर हे आपली नखे हळू-हळू वाढण्याचे संकेत आहेत.
लहान पांढरे डाग-नखांवर पांढरे डाग असतील तर आपल्या शरीरात रक्ताची कमतरता आहे. तसेच केसांची गळतीची समस्या आणि त्वचे संबंधित समस्यांचे हे लक्षण आहे.
लांब काळ्या रेषा-अशा प्रकारचा रेषा दिसल्यास अजिबात दुर्लक्ष करू नका. सतत अशा प्रकारच्या रेषा दिसत असल्यास तर त्वरितच डॉक्टरांशी सपंर्क करा. या रेषा हृदय रोग असण्याचे संकेत देतात.