काय आहे Premature Ovarian Failure? आईची काळजी घेणाऱ्यांना हे माहीत असायलाच हवं!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 10:03 AM2020-01-21T10:03:05+5:302020-01-21T10:13:36+5:30

यातील आश्चर्याची बाब म्हणजे जास्तीत जास्त महिलांना स्वत: हे माहीत नसतं की, त्यांच्यासोबत नेमकं काय होत आहे.

You should know about menopause and premature ovarian failure | काय आहे Premature Ovarian Failure? आईची काळजी घेणाऱ्यांना हे माहीत असायलाच हवं!

काय आहे Premature Ovarian Failure? आईची काळजी घेणाऱ्यांना हे माहीत असायलाच हवं!

googlenewsNext

(Image Credit : progressive-charlestown.com)

ज्या महिलांमध्ये ४० वयात किंवा त्याआधी मासिक पाळी येणे बंद होते, त्या महिलांमध्ये वेगवेगळ्या दीर्घकालीन आजारांचा धोका वाढतो. खासकरून या महिला ६० वय झाल्यानंतर कार्डिओवस्कुलर आणि डायबिटीससारख्या क्रॉनिक म्हणजेच दीर्घकालीन आजाराच्या संपर्कात येतात. अर्थातच आई या आजारांची शिकार झालेलं कुणालाही चालणार नाही. पण जसजसं वय वाढत जाणार हे आजार आईला जाळ्यात देण्याची शक्यता वाढत जाणार. 

यातील आश्चर्याची बाब म्हणजे जास्तीत जास्त महिलांना स्वत: हे माहीत नसतं की, त्यांच्यासोबत नेमकं काय होत आहे. जर मूड स्विंग्ससोबतच आईच्या आरोग्यात वेगवेगळे बदल बघायला मिळत असतील तर वेळीच सावध व्हावं. आता त्यांची काळजी घेण्याची वेळ तुमची आहे. जेणेकरून त्या एक हेल्दी आणि निरोगी म्हातारपण जगू शकतील. 

(Image Credit : : essynursingservices.com)

ज्या महिलांमध्ये मेनॉपॉज ५० ते ५५ वयात येतं, त्यांना ६० वयात हृदयासंबंधी आजार आणि शुगरची समस्या होण्याचा धोका तीन पटीने अधिक कमी होतो. यासंबंधी करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, जास्त उप्तन्न असलेल्या देशांमध्ये मेनोपॉजनंतर महिला त्यांच्या आयुष्याचा एक तृतीयांश भाग एन्जॉय करत आहे. ही बाब ह्यूमन रिप्रॉडक्शन जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चमधून समोर आली आहे. या रिसर्चच्या लेखकांनुसार, नैसर्गिक पद्धतीने मेनोपॉजची वेळ आणि आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या यातील संबंध याच्याशी संबंधित हा अशाप्रकारचा पहिलाच रिसर्च आहे.

(Image Credit : videohive.net)

या रिसर्चसाठी ऑस्ट्रेलियन नॅशनल हेल्थ सर्व्हेकडून पाच हजारपेक्षा जास्त महिलांचा डेटा एकत्र करण्यात आला होता. या महिलांनी १९९६ ते २०१६ दरम्यान याबाबतची माहिती दिली की, त्यांना डायबिटीस, स्ट्रोक, डिप्रेशन, अस्थमा किंवा ब्रेस्ट कॅन्सर सारख्या आणखी ११ आजारांचा सामना करावा लागला की नाही. तब्बल २० वर्ष करण्यात आलेल्या या रिसर्चमधून समोर आले की, ज्या महिलांमध्ये प्रीमच्योर मेनोपॉजची स्थिती आली, त्यांना मल्टीमोर्बिडिटी म्हणजे मेनोपॉजनंतर होणाऱ्या एकापेक्षा जास्त समस्यांचा सामना करावा लागला.

(Image Credit : picfair.com)

क्वींसलॅंड विश्वविद्यालय, ब्रिस्बेनमधील सेंटर फॉर  लॉग्निट्यूडिनल अ‍ॅन्ड लाइफ कोर्स रिसर्चचे निर्देशक आणि या रिसर्चच्या मुख्य लेखिका गीता मिश्रा म्हणाल्या की, आमच्या रिसर्चमधून हे समोर आलं की, मल्टीमॉर्बिडिटी(मेनोपॉजनंतर होणाऱ्या समस्या) मिड एज आणि वयोवृद्ध महिलांमध्ये फार कॉमन आहे. सोबतच प्रीमच्योर मेनोपॉज या महिलांमध्ये या समस्या वाढण्याचा धोका वाढवतं.

(Image Credit : florida-elderlaw.com)

याबाबत अभ्यासकांचं मत आहे की, ज्या महिला नैसर्गिक पद्धतीने मेनोपॉजच्या स्थितीतून जात असतात त्यांना डॉक्टरांकडून आरोग्यासंबंधी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. जेणेकरून पुढे जाऊन त्यांना दुसऱ्या समस्यांचा सामना करावा लागू नये.


Web Title: You should know about menopause and premature ovarian failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.